Type to search

Breaking News आवर्जून वाचाच जळगाव नवरात्री

एस.टी.आगारावर मनुदेवी प्रसन्न : दर्शनासाठी भाविकांची हजारोच्या संख्येने उपस्थिती

Share

चिंचोली,ता.यावल (वार्ताहर) –

सातपुडा निवासिनी श्रीक्षेत्र मनुदेवी येथे नवरात्रोत्सवात मोठी गर्दी वाढत असल्याने दि.२ बुधवार पासून खाजगी वाहनाना मंदिरापर्यंत जाण्यास बंदी करण्यात आली आहे.

मनापुरी ते मनुदेवी एसटीनेच प्रवास

भाविकांची वाढती गर्दी व भाविक ज्या खाजगी वाहनांनी दर्शनाला येतात अश्या चार चाकी वाहने, दुचाकी वाहने तसेच महामंडळाच्या बसेस या सर्व वाहनांमुळे मनुदेवी मंदिराकडे जाणारा मार्गावर मोठी अडचण निर्माण होते. त्यामुळे तासोंतास ही वाहने पुढे मार्गस्थ होण्यास मोठी अडचण होते यासाठी मंदिर प्रशासनाने यावर्षी मनापुरी या आदिवासी गावाजवळ सर्व दुचाकी चारचाकी व खाजगी वाहनाना पार्किंगसाठी मनुदेवी संस्थानने पाच एकर जागेवर व्यवस्था केली असुन चिंचोली कडुन येणारे सर्व वाहने पार्किंग ठिकाणी लावुन तेथून पुढील प्रवास बसने करावा लागत आहे.

एस.टी.महामंडळावर मनुदेवी प्रसंन्न

मंदिरापर्यंत जाणारी सर्व खाजगी वाहनांना बंदी असून भाविकांना मनापुरी गावाजवळ आपले वाहन पार्क करून मनुदेवी दर्शनासाठी मंदिरापर्यंतचा प्र

वास एस.टी.नेच करावा लागत आहे. पार्किंग स्थळी महामंडळाच्या बसेस भाविकांना पार्किंग ते मनुदेवी मंदिर असे सोडत आहे. बुधवारी यावल आगाराच्या ८ तर जळगाव आगाराच्या काही बसेस दिवसभर भाविकांचा प्रवास सोयीचा व्हावा यासाठी भरली की चालली याप्रमाणे ये-जा करत आहेत. मनापूरी ते मनुदेवी मंदिर पर्यंतचा सहा-सात कि.मी. अंतरासाठी एस.टी.चे १० रू. असे दोन्हीकडील २० रू.भाडे प्रवाशांना द्यावे लागत आहे. यामुळे या नवरात्रोत्सवात एस.टी.महामंडळाला फायदा होत असल्याने मनुदेवी प्रसन्न असल्याचे बोलले जात आहे.

हजारो भाविकांची हजेरी

बुधवारी जवळपास पस्तीस ते चाळीस हजार भाविकांनी दर्शनाला हजेरी लावली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासनाने नवरात्रोत्सव सुरू होण्याच्या आधिच मनुदेवी येथे आढावा बैठक घेवुन भाविकांना सुखसोयी उपलब्ध करून देण्यासाठी आश्वासन दिले आहे. कायदा सुव्यवस्थेसाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

बसेस कमी पडल्याने एक कि.मी रांगा

बुधवार दि.२ रोजी यावल व जळगाव आगाराच्या दहा बसेस उपलब्ध होत्या. तरीही या बसेस भाविकांनी फुल्ल भरून जात होत्या. त्यामुळे मनुदेवी गेलेल्या बसेस लवकर परत येत नसल्याने व एस.टी.च्या प्रवासासाठी पार्किंग ठिकाणी भाविकांची सुमारे एक कि.मी.पर्यंत मोठी रांगा लागलेली दिसत होती. त्याचप्रमाणे दर्शनासाठी सुध्दा मोठ्या रांगा लागल्याचे दिसत आहे.

एस.टी.बसेस वाढविणार

उद्या गुरूवार रोजी बसेस वाढविण्यात येणार असल्याचे यावल एस.टी.आगार प्रमुख श्री.भालेराव व मनुदेवी संस्था अध्यक्ष शांताराम पाटील यांनी सांगितले. शनिवार व रविवार रोजी सप्तमी व अष्टमी सुटीच्या दिवसाचा योगायोग येत असल्याने दोन-तीन दिवस लाखो भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!