Friday, April 26, 2024
Homeमनोरंजन'रतन टाटां'च्या बायोपिकमध्ये आर माधवन काम करणार?, माधवन म्हणाला…

‘रतन टाटां’च्या बायोपिकमध्ये आर माधवन काम करणार?, माधवन म्हणाला…

मुंबई | Mumbai

टाटा समुहाचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष रतन टाटा यांच्या आयुष्यावर चित्रपट बनणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु झाली आहे. इतकेच नव्हे, तर या बायोपिकमध्ये अभिनेता आर माधवन हा मुख्य भूमिका साकारणार असल्याचं बोललं जात आहे.

- Advertisement -

सोशल मीडियावर बरेच फोटोही व्हायरल होत आहेत, जे शेअर करत असा दावा केला जात आहे की आर माधवन या चित्रपटात रतन टाटा यांची भूमिका साकारणार आहे. हेच पोस्टर पाहून एका चाहत्यानेही प्रश्न विचारला आहे. प्रश्न असा आहे की- तुम्ही रतन टाटाच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका साकारणार आहात. जर असे झाले तर ते बर्‍याच लोकांसाठी प्रेरणास्थान बनतील. या चाहत्याच्या प्रश्नाला खुद्द माधवन यांनी उत्तर दिले आहे.

चाहत्यांच्या अपेक्षांचा भंग करत माधवनने हे स्पष्ट केले आहे की अशा कोणत्याही चित्रपटात तो काम करणार नाही. त्याला सध्या रतन टाटाची भूमिका साकारण्याची ऑफर मिळालेली नाही. ट्विटमध्ये असे लिहिले आहे, “दुर्दैवाने हे खरे नाही. ही फक्त काही चाहत्यांची इच्छा आहे, म्हणून त्यांनी अशी पोस्टर केली आहेत. असा कोणताही प्रकल्प पाइपलाइनमध्ये नाही. यावर कोणतीही चर्चा चालू नाही.”

या ट्विटवर त्याच्या अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत त्याच्या आगामी ‘रॉकेट्री: द नंबी इफेक्ट’ या चित्रपटाविषयी प्रश्न विचारले.आर माधवन लवकरच एरोस्पेस अभियंता आणि वैज्ञानिक नंबी नारायण यांच्या जीवनावर तयार होणार्‍या या बायोपिक चित्रपटात दिसणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या