Friday, April 26, 2024
Homeमनोरंजनका म्हणाली असेल बर अभिनेत्री सायली सजीव : त्याच दुसर्‍या कोणाशी आणि...

का म्हणाली असेल बर अभिनेत्री सायली सजीव : त्याच दुसर्‍या कोणाशी आणि माझ दुसर्‍या कोणाशी लग्न होईल तेव्हाच…

मुंबई | Mumbai

३ एप्रिलला पॉक स्टेडियमवर लखनऊ सुपरजायंट्स (Lucknow Supergiants) आणि चेन्नई सुपर किंग्ज संघ (Chennai Super Kings team) आमनेसामने होते. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने लखनऊ सुपरजायंट्सवर १२ धावांनी शानदार विजय मिळवला होता. यावेळी सीएसके संघाचा ऋतुराज गायकवाड (Rituraj Gaikwad of CSK team) यावेळी अगदी उत्तम खेळला. ही मॅच जिंकल्यानंतर दुसऱ्या दिवशी सायलीने (Sayley) पिवळ्या रंगाचा (Yellow in color) ड्रेस परिधान करुन फोटो पोस्ट केला.

- Advertisement -

या फोटोवरुन तिला बरंच ट्रोल करण्यात आलं होतं. यावर सायलीने आता भाष्य केलं आहे.

या फोटोवरुनच ऋतुराजबरोबर तिच्या नात्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. ‘मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखतीत सायली तिच्या व ऋतुराजच्या नात्याबाबत विचारण्यात आलं. यावेळी ती म्हणाली, “आम्ही फक्त चांगले मित्र आहोत. पण या सगळ्या ट्रोलिंगमुळे आता आमची मैत्रीही राहिलेली नाही असं मला वाटतं. ट्रोलिंगचा आम्हाला त्रासच झाला आहे”.

“काही दिवसांपूर्वीच मी पिवळा ड्रेस परिधान करुन एक फोटो पोस्ट केला. माझ्या चित्रपटाचं प्रमोशन म्हणून मी हा फोटो पोस्ट केला. तो फोटो पोस्ट केल्यानंतर ज्या कमेंट होत्या त्या वाचूनच मला भीती वाटायला लागली. मला असं वाटायला लागलं की, पिवळे कपडे परिधान करणंच मी बंद केलं पाहिजे.

मी याआधीही पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करत होते. पण आपीएल आली की ही सगळी चर्चा सुरू होते. त्याचं दुसऱ्या कोणाशी तरी लग्न होईल किंवा माझं दुसऱ्याच कोणत्या तरी व्यक्तीबरोबर लग्न होईल तेव्हाच या चर्चा बंद होतील”. सायलीने अगदी उघडपणे ऋतुराजबरोबरच्या नात्यावर भाष्य केलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या