मनाेरंजन: दीपिका सर्कसमधुन लावणार ४४० ला करंट : पहा टिझर

मनाेरंजन: दीपिका सर्कसमधुन लावणार ४४० ला करंट : पहा टिझर

अभिनेत्री दीपिका पदुकोणचा आता हटके लूक समोर आला आहे. दीपिकाचे नवं गाणं व्हायरल झाले असून त्याला नेटकऱ्यांचा जोरदार प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. गेल्या काही दिवसांपासून दीपिकाच्या त्या गाण्याची चर्चा होती.

 

सर्कस या चित्रपटामध्ये दीपिका करंट लगा रे गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. आज त्याचा टीझर व्हायरल झाला असून त्याला दीपिकाच्या लाखो चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

दीपिका एका चमकदार गुलाबी एथनिक लूकमध्ये दिसत आहे.

 दीपिकानं देखील तिच्या सोशल मीडियावरुन त्या गाण्याचा टीझर शेयर केला आहे. बॉलीवूडमध्ये सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्यांच्या यादीत अव्वल असणाऱ्या दीपिकाच्या चाहत्यांनी तिच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे.

दीपिका त्या गाण्यामध्ये भलतीच सुंदर दिसते आहे. तिच्या डान्स स्टेपला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे.

रोहित शेट्टी दिग्दर्शित सर्कसमध्ये मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव, प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिझही दिसणार आहे

दीपिकाचा डान्स व्हायरल होताच नेटकऱ्यांच्या कल्पनेला धुमारे फुटले आहे. एकानं तर दीपिकाचं कौतूक करताना बऱ्याच दिवसांनंतर दीपिका वेगळ्या भूमिकेत दिसली याचा आनंद व्यक्त केला आहे

दीपिका आणि रणवीर एका फ्रेममध्ये दिसत आहेत जेव्हा ते चित्रपटातील 'करंट लगा रे' गाण्यावर मनापासून नृत्य करतांना दिसत आहेत. पहा सर्कसचा हा टिझर

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com