प्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचं निधन, ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

प्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचं निधन, ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई । Mumbai

काही दिवसांपासून चित्रपटसृष्टीतून दुःखद बातम्या समोर येत आहेत. चित्रपटसृष्टीशी संबंधित आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. तेलगू चित्रपटांचे सुप्रसिद्ध अभिनेते चलपती राव यांचे शनिवारी रात्री निधन झाले आहे. चलपती राव यांनी वयाच्या ७८ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार, हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या अचानक मृत्यूने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या जाण्यामुळे साऊथ सिनेसृष्टीवर मोठी शोककळा पसरली आहे. चलपती राव यांच्या जाण्याने कुटुंब, मित्र-परिवार, चाहते यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

चलपती राव यांचा जन्म ८ मे १९४४ रोजी कृष्णा जिल्ह्यातील बल्लीपरु येथे झाला. १९६६ मध्ये गुडाचरी ११६ या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. राव यांनी ६०० हून अधिक चित्रपटांमध्ये विविध संस्मरणीय भूमिका साकारल्या. अभिनेता बराच काळ चित्रपटांपासून दूर होते.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com