Thursday, April 25, 2024
Homeमनोरंजनप्रसिद्ध मराठी अभिनेत्री माधवी गोगटे यांचं निधन

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री माधवी गोगटे यांचं निधन

मुंबई | Mumbai

प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचे निधन झाले. त्या ५८ वर्षांच्या होत्या. मुंबईतील सेव्हन हिल रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.

- Advertisement -

माधवी गोगटे यांचा जन्म ७ ऑगस्ट १९६४ रोजी झाला. त्यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीपासून केली. १९८७ मध्ये ‘सूत्रधार’ चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

माधवी गोगटे यांनी अनेक मराठी आणि हिंदी टीव्ही मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये भूमिका साकरल्या होत्या. ‘भ्रमाचा भोपळा’ आणि ‘गेला माधव कुणीकडे’ ही त्यांची मराठी नाटकं तुफान गाजली. ‘घनचक्कर’ या चित्रपटातील त्यांची भूमिका लोकप्रिय झाली.

माधवी गोगटे यांनी मराठीसोबत हिंदी मनोरंजनक्षेत्रातही अभिनयाचा ठसा उमटवला होता. ‘मिसेस तेंडुलकर’, ‘कोई अपना सा’, ‘ऐसा कभी सोचा न था’, ‘एक सफर’, ‘बसेरा’, ‘बाबा ऐसो वर ढुंडो’, ‘ढूंढ लेंगी मंझिल हमें’, ‘कहीं तो होगा’ या हिंदी मालिकांतील त्यांच्या अभिनयाचे कौतुक झाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या