पडद्यावरची 'गोड आजी' हरपली, ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे काळाच्या पडद्याआड

पडद्यावरची 'गोड आजी' हरपली, ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे काळाच्या पडद्याआड

मुंबई | Mumbai

पन्नासच्या दशकात मराठी चित्रपटसृष्टीत सोज्वळ नायिकांची प्रतिमा मोडून टाकून मॉडर्न टच देण्याचा प्रयत्न करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. त्या ८९ वर्षांच्या होत्या. मुंबईतील माहिम इथल्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

चित्रा नवाथे यांचे खरे नाव कुसुम सुखटणकर होते. दादरला मिरांडा चाळीत राहणाऱ्या कुसूम आणि कुमूद सुखटणकर या भगिनींनी १९४५च्या दरम्यान मराठी चित्रपटांमधून बालकलाकार म्हणून भूमिका करायला सुरुवात केली होती. गदिमांनी कुसुम यांचे नाव बदलून चित्रा असे ठेवले होते.

पडद्यावरची 'गोड आजी' हरपली, ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे काळाच्या पडद्याआड
अचानक ट्रॅक्टरसमोर येऊन उभा राहिला बिबट्या अन्..., पुढं जे घडलं ते थक्क करणारं

१९५२ साली प्रदर्शित झालेला राजा परांजपे दिग्दर्शित ‘लाखाची गोष्ट’ हा या दोन्ही बहिणींचा नायिका म्हणून पहिला चित्रपट होता. प्रसिद्ध दिग्दर्शक राजा नवाथे यांच्याशी चित्रा यांचा विवाह झाला होता. अलीकडच्या काळात त्यांनी ‘बोक्या सातबंडे’, ‘अगडबंब’ या चित्रपटात काम केले होते.

पडद्यावरची 'गोड आजी' हरपली, ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे काळाच्या पडद्याआड
जिकडे तिकडे बिबटेच बिबटे, सांगा आम्ही शेती करू कशी?; बळीराजाचा आर्त सवाल

अभिनेत्री चित्रा नवाथे यांनी ‘लाखाची गोष्ट’, ‘वहिनीच्या बांगड्या’, ‘गुळाचा गणपती’, ‘बोलविता धनी’, ‘उमज पडेल तर’, ‘राम राम पाव्हणं’, ‘टिंग्या’ अशा अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे. व्यावसायिक रंगभूमीवरही रेखा यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.

पडद्यावरची 'गोड आजी' हरपली, ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे काळाच्या पडद्याआड
रस्त्यांना तडे, जमिनीतून येणारं पाणी अन् भिंतीना भेगा... संपूर्ण शहरच जमीन गिळंकृत करणार?; भारतातील 'या' शहरात मोठं संकट

'एकच प्याला', 'संशयकल्लोळ' यांसारख्या संगीत नाटकांतून तसंच 'तुझं आहे तुजपाशी', 'लग्नाची बेडी', 'प्रेमाच्या गावे जावे', 'दिल्या घरी तू सुखी राहा' यांसारख्या व्यावसायिक नाटकांतून त्यांनी भूमिका केल्या. काही वर्षांपूर्वी त्यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे अभिनयातून निवृत्ती स्वीकारली होती.

पडद्यावरची 'गोड आजी' हरपली, ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे काळाच्या पडद्याआड
निर्दयीपणाचा कळस! ...म्हणून पीडितेला फरफटत नेलं; दिल्ली प्रकरणात आरोपींचा धक्कादायक खुलासा
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com