ज्येष्ठ गायिका, अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांचं निधन

ज्येष्ठ गायिका, अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांचं निधन

पुणे | Pune

ज्येष्ठ गायिका आणि संगीत नाट्यात (Veteran singer, actress) मोलाची कामागिरी केलेल्या किर्ती शिलेदार (Kirti Shiledar) यांचे आज सकाळी निधन झाले. त्या ७० वर्षांच्या होत्या. अस्वस्थ वाटू लागल्यानंतर सकाळी त्यांना उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथं उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

ज्येष्ठ गायिका, अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांचं निधन
PHOTO : का होतेय अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’वर बंदीची मागणी?

पुणे विद्यापीठातून साहित्य शाखेच्या पदवी घेतलेल्या कीर्ती शिलेदार यांची भूमिका असलेल्या नाटकांचे आजवर ४ हजारहून अधिक प्रयोग झाले. देशातल्या मराठी रसिकांसाठीही त्यांनी देशाच्या विविध शहरांत मराठी संगीत नाटकांचे प्रयोग केले. संगीत कान्होपात्रासह जुन्या नाटकातल्या गाण्यांचा गोडवा त्यांनी नव्या पिढीपर्यंत पोहोचवला. गोड गळा आणि शास्त्रीय संगीतासाठी केलेल्या प्रचंड परिश्रमामुळे कीर्ती शिलेदार यांनी संगीत मराठी नाटकात केलेल्या सर्वच भूमिका गाजल्या.

ज्येष्ठ गायिका, अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांचं निधन
Dhanush and Aishwaryaa : धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत यांचा घटस्फोट, का घेतला निर्णय?

अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. संगीत रंगभूमीच्या पडत्या काळात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. ६० वर्षांत आपल्या चतुरस्र अभिनयानाने व गायनाने त्यांनी रंगभूमीवर स्वत:चा ठसा उमटवला. संगीत रंगभूमी पुन्हा जोमाने बहरून येईल असा विश्वास त्या नेहमी व्यक्त करायच्या. आज दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

ज्येष्ठ गायिका, अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांचं निधन
सोनाली कुलकर्णीचा मकरसंक्रातीनिमित्तचा लूक पाहिलात का...

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com