Friday, April 26, 2024
Homeमनोरंजनज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचं निधन

मुंबई | Mumbai

जेष्ठ बॉलिवूड अभिनेत्री शशिकला जावळकर यांचं निधन झालं. त्या ८८ वर्षांचं होत्या. आज (४ एप्रिल) दुपारी १२ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

- Advertisement -

त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. ७०च्या दशकात अनेक सिनेमांमधून शशिकला यांनी त्यांच्या अभिनयाची छाप उमटवली आहे.

मुळच्या सोलापूरच्या असलेल्या शशिकला यांचं संपूर्ण नाव शशिकला जवळकर असं होतं. ओमप्रकाश सैगल यांच्याशी नंतर त्यांनी विवाह केला. शशिकला यांना लहानपणापासूनच नृत्य आणि अभिनयाची आवड होती. वयाच्या पाचव्या वर्षापासूनच त्यांनी नृत्य शिकण्यास सुरुवात केली होती.

मुख्य अभिनेत्री, खलनायिका, आई अशा विविध प्रकारच्या भूमिका त्यांनी साकारल्या आहेत. या अष्टपैलू अभिनेत्रीनं जवळपास १०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

शशिकला यांच्या वडिलांचं उद्योगात मोठं नुकसान झाल्याने त्यांचं संपूर्ण कुटूंब काम शोधण्यासाठी मुंबईत आलं. याचवेळी त्यांची भेट लोकप्रिय गायिका-नूरजहाँ यांच्याशी झाली. नूरजहाँचे पतीच दिग्दर्शित करीत असलेल्या ‘झिनत’ या चित्रपटात कव्वालीच्या सीनमध्ये शशिकला यांना संधी मिळाली. त्यानंतर व्ही. शांताराम यांच्या ‘तीन बत्ती चार रास्तामध्ये’ त्यांनी एक भूमिका साकारली.

प्रामुख्यानं त्यांचे ‘नौ दो ग्यारह’, ‘कानुन’, ‘जंगली’, ‘हरियाली और रास्ता’, ‘अनपढ’, ‘यह रास्ते हैं प्यार के’, ‘वक्त’, ‘देवर’, ‘अनुपमा’, ‘नीलकमल’, ‘तीन बहुरानियाँ’, ‘हमजोली’, ‘सरगम’, ‘क्रांती’, ‘रॉकी’, ‘बादशहा’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘चोरी चोरी’ हे चित्रपट सुपरहिट ठरले होते. 2005 पर्यंत त्या सिनेसृष्टीत कार्यरत होत्या. परंतु पुढे वाढत्या वयामुळं त्यांनी अभिनयातून निवृत्ती स्विकारली.

२००७ साली भारत सरकारनं शशिकला यांच्या सिनेमातील योगदानासाठी ‘पद्मश्री’ किताबाने गौरविलं, तसंच २००९ साली व्ही. शांताराम लाईफ टाईम अचिव्हमेंट अवार्डही त्यांना प्रदान करण्यात आला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या