तोकड्या कपड्यांमुळे उर्फी जावेदला पोलिसांकडून अटक? VIDEO व्हायरल

तोकड्या कपड्यांमुळे उर्फी जावेदला पोलिसांकडून अटक? VIDEO व्हायरल

मुंबई | Mumbai

उर्फी जावेद ही आपल्या फॅशनमुळे कायम चर्चेत असते. निरनिराळे कपडे घालून ती सर्वांचं लक्ष वेधत असते. यामुळे तिला अनेकदा ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. एवढंच नव्हे तर अनेकांनी कपड्यांवरुन तिच्यावर तक्रारीही दाखल केल्या आहेत. अशातच उर्फीविषयी महत्वाची बातमी समोर आली आहे. उर्फी जावेदला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओत काही पोलीस येतात आणि ते उर्फीला त्यांच्यासोबत पोलिस स्टेशनला घेऊन जाणार असल्याचे म्हणत आहेत. पोलिसांना पाहून उर्फी त्यांना विचारते की ते हे सगळं का करत आहेत. तेव्हा त्या दोन महिला पोलिसांच्या वेषात आल्या आणि बोलतात की ती तोकडे कपडे परिधान करते आणि याच कारणामुळे तिला पोलिस स्टेशनला जावं लागणार आहे.

तर उर्फी त्यानंतरही सतत पोलिस स्टेशनला जाण्यास नकार देते. पण त्या दोघी पोलीस वेषात असलेल्या महिला ऐकत नाही आणि उर्फीला गाडीत बसवून घेऊन जातात. त्यावेळी उर्फी बोलते की हे काय आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला असून तिचे चाहते चिंता व्यक्त करत आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हे सगळं खोटं असल्याचं म्हटलं आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com