दीपिका पादुकोण करणार साऊथच्या "या" सुपरस्टारसोबत काम
मनोरंजन

दीपिका पादुकोण करणार साऊथच्या "या" सुपरस्टारसोबत काम

त्या सुपरस्टारचा 21 वा चित्रपट

Nilesh Jadhav

दीपिका पादुकोण साऊथचा सुपरस्टार प्रभास सोबत काम करणार आहे. दीपिका आणि प्रभासच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

प्रभासने Instagram वर एक व्हिडिओ अपलोड करत या बाबत माहिती दिली. त्याने व्हिडिओच्या Caption मध्ये लिहले आहे, " या प्रोजेक्टमध्ये दीपिका पादुकोण येण्यामुळे आम्ही खूप उत्सुक आहोत."

या चित्रपटाची निर्मिती तेलगू सिनेमाची लोकप्रिय चित्रपट निर्मिती कंपनी विजयन्ती मूव्हीज(Vyjayanthi Movies) करत आहे. हा एक मोठा बजेट असलेला चित्रपट आहे, जो अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होईल.

त्याचबरोबर दीपिका पादुकोणनेही रिट्विट करत म्हंटले आहे, " मी या प्रवासासाठी प्रतीक्षा करू शकत नाही."

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com