'अनुपमा' फेम नितेश पांडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

'अनुपमा' फेम नितेश पांडे यांचे हृदयविकाराच्या   झटक्याने निधन

मुंबई | Mumbai

टीव्ही अभिनेते आणि 'अनुपमा' (Anupama) मालिकेत रुपाली गांगुली (Rupa Ganguly) हिच्या मैत्रिणीच्या पतीची भूमिका साकारणारे नितेश पांडे (Nitesh Pandey) यांचे मंगळवार (दि.२३मे) रोजी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे टिव्ही विश्वावर शोककळा पसरली आहे....

नितिश पांडे यांच्या आकस्मित निधनाने त्यांचे कुटुंबिय आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. वयाच्या ५० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लेखक सिद्धार्थ नागर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून त्यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले की, “नितेश माझ्यापेक्षा खूप तरुण होते. त्यांना हृदयासंबंधित कोणताही विकार नव्हता. त्यांच्या निधनाने माझ्या बहिणीला धक्का बसला आहे. तिच्याशी मी बोलूही शकत नाहीये. नितेश यांच्या निधन झाल्याचे समजल्यानंतर त्याचे वडील लगेचच इगतपुरीला रवाना झाले असून मी सुद्धा इगतपुरीला जात आहे,'' असे सिद्धार्थ नागर म्हणाले आहेत.

'अनुपमा' फेम नितेश पांडे यांचे हृदयविकाराच्या   झटक्याने निधन
सिनेविश्वावर शोककळा! 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीचा कार अपघातात मृत्यू
'अनुपमा' फेम नितेश पांडे यांचे हृदयविकाराच्या   झटक्याने निधन
सुरगाणा बाजार समिती सभापतीपदी पवार, उपसभापतीपदी चौधरी यांची निवड

दरम्यान, नितीश पांडे यांचा जन्म १७ जानेवारी १९७३ रोजी झाला. नितेश पांडे यांनी अनेक हिंदी चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम केले होते. 'ओम शांती ओम' या चित्रपटातही त्यानी शाहरुख खानच्या असिस्टंटची भूमिका साकारली होती. यासह, ते 'बधाई दो', 'रंगून', 'हंटर', 'दबंग 2', 'बाजी', 'मेरे यार की शादी है', 'मदारी' आणि 'खोसा का घोसला' यांसारख्या इतर अनेक चित्रपटांच्या माध्यमातुन त्यांनी प्रेक्षकांच मनोरंजन केले. तसेच सध्या ते 'अनुपमा' मालिकेत धीरज कपूर या भूमिकेत दिसत होते. त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांचे प्रेम मिळत होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com