बहुचर्चित चित्रपट 'Y' चा ट्रेलर प्रदर्शित

बहुचर्चित चित्रपट 'Y' चा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई | Mumbai

गेल्या अनेक दिवसांपासून एका मराठी चित्रपटाबद्दल (Marathi Movie) सतत चर्चा सुरु आहे. तो नवा चित्रपट म्हणजे वाय (Y). या नावामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. सर्व प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना २४ जूनला मिळणार आहे. २४ जूनला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे...

सिनेमाची उत्सुकता वाढावी म्हणून चित्रपटाचा ट्रेलर (Trailer) नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. हा मराठीतील पहिला हायपरलिंक सिनेमा असणार आहे.

वाय या शब्दामागे खूप मोठा अर्थ दडलेला आहे. चित्रपटाची कथा सत्य घटनेवर आधारित आहे. मुक्ता बर्वेने (Mukta Barve) या चित्रपटात एका शासकीय अधिकाऱ्याची भूमिका साकारलेली आहे.

याशिवाय चित्रपटात अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali), संदीप पाठक (Sandip Pathak), नंदू माधव (Nandu Madhav), ओमकार गोवर्धन (Omkar Govardhan), रसिका चव्हाण (Rasika Chavhan), सुहास शिरसाट (Suhas Shirsat) हे मुख्य कलाकार आहेत. रोहित कोकाटे (Rohit Kokate), संदीप दंडवते (Sandip Dandvate) आणि प्रदीप भोसले (Pradip Bhosale) हे सहकलाकार आहेत.

अजित सूर्यकांत वाडीकर (Ajit Suryakant Wadikar) यांनी चित्रपटाच्या कथेचे लेखन केले आहे. तर कंट्रोल एन प्रोडक्श्नने चित्रपटाची निर्मिती केली आहे.

सलिल परांजपे, नाशिक.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com