Saturday, April 27, 2024
Homeमनोरंजनमहेश मांजरेकर दिग्दर्शित ‘कोन नाय कोनचा’चा ट्रेलर सोशल मीडियावरून हटवला; काय आहे...

महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘कोन नाय कोनचा’चा ट्रेलर सोशल मीडियावरून हटवला; काय आहे कारण?

मुंबई | Mumbai

आशय, विषय आणि सादरीकरण यांत नेहमी वैविध्य राखत महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी अनेक कलाकृती केल्या आहेत. त्यामुळे त्यांचा येणारा प्रत्येक चित्रपट हा प्रेक्षकांसाठी मेजवानीच असते.

- Advertisement -

Sanskruti Balgude : संस्कृती बालगुडेच्या मनमोहक सौंदर्याची नेटकऱ्यांना भुरळ

लवकरच त्यांचा ‘नाय वरन भात लोन्चा कोन नाय कोन्चा’ (Naay Varanbhaat Loncha Kon Naay Koncha) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला होता.

मात्र या चित्रपटामुळं महेश मांजरेकर यांची चिंता मात्र वाढली आहे. ‘वरन भात लोनचा, कोन नाय कोनचा’ या या चित्रपटात दाखण्यात आलेल्या दृष्यांमुळे महिला आयोगाने या चित्रपटाविरोधात तक्रार नोंदवली. त्यामुळे आता या चित्रपटाचा ट्रेलर सर्व प्लॅटफोर्मवरून हटवण्यात आला आहे.

PHOTO : मुकेश अंबानींकडून अलिशान हॉटेलची खरेदी; तब्बल ७३५ कोटींची गुंतवणूक

काय आहे या दृश्यांमध्ये?

या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये चित्रपटातील महिला आणि अल्पवयीन मुलाच्या पात्रांच्या काही आक्षेपार्ह दृश्यांवरून वाद सुरू झाला. महाराष्ट्रातील भारतीय स्त्री शक्ती या संस्थेने चित्रपटातील दृश्यांवर आक्षेप घेत महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली. या चित्रपटात आणि ट्रेलरमध्ये महिला आणि अल्पवयीन मुलांना आक्षेपार्ह पद्धतीने दाखवण्यात आले असल्याचं या तक्रारीत म्हटलं होत.

- Advertisment -

ताज्या बातम्या