
मुंबई । Mumbai
छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय शोपैकी एक अशी 'तारक मेहता का उल्टा चश्मा'ची (Taarak Mehata Ka Ooltah Chshmah) ओळख असून हा शो गेल्या १४ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या शोमधील प्रत्येक कलाकाराला तुफान लोकप्रियता मिळाली आहे. परंतु 'दयाबेन' (Dayaben) या भूमिकेला विशेष पसंत केले जाते. ही भूमिका अभिनेत्री दिशा वकानीने (Disha Vakani) साकारली होती...
गेल्या चार वर्षांपासून दयाबेनने (दिशा वकानी ) काही कारणात्सव हा शो सोडला होता. तेव्हापासून प्रेक्षक 'दयाबेन'ला शोमध्ये मिस करत होते. पण अखेर आता प्रेक्षकांची प्रतिक्षा संपली आहे. कारण शो च्या निर्मात्यांना नवीन 'दयाबेन' मिळाली आहे.
दयाबेनच्या भूमिकेसाठी राखी विजानशी (Rakhi Vijan) संपर्क साधण्यात आला आहे. राखी ही छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक असून तिने याआधी 'देख भाई देख', 'बनेगी अपनी बात', 'नागिन ४' यांसारख्या शोमध्ये काम केले आहे. यामुळे प्रेक्षकांना नवी दयाबेन आणि जेठालाल याला नव्या स्वरुपातली दया मिळणार आहे.
तसेच 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या टीव्ही सिटकॉमचे निर्माता असित कुमार मोदी (Asit Kumarr Modi) यांनी अलीकडेच माहिती दिली होती की, दयाबेन हे प्रसिद्ध पात्र शोमध्ये परत येईल. परंतु दयाबेनची भूमिका (Role) करणारी दिशा वकानीच्या पुनरागमनाची पुष्टी करू शकत नाही. शोचे दर्शक त्यांच्या आवडत्या दिशा वकानीला मिस करत आहेत. ,
दरम्यान, अभिनेत्री दिशा वकानी नेहमीच सर्वांच्या आठवणींत राहणार आहे. जुनी दयाबेन दिशा वकाणी हिचे 'हे माँ माताजी' पासून ते 'टप्पू के पापा' पर्यंत सिग्नेचर डायलॉग चाहत्यांनी डोक्यावर घेतले होते. दिशा वकानी यांनी सप्टेंबर २०१७ मध्ये प्रसूतीसाठी सुट्टी घेतली आणि त्यानंतर त्या शो मध्ये परत आल्याच नाही.