सुशांतसिंग राजपूत आत्महत्या; सीबीआय चौकशी नाही
मनोरंजन

सुशांतसिंग राजपूत आत्महत्या; सीबीआय चौकशी नाही

मुंबई पोलिस हे प्रकरण सोडवतील

Nilesh Jadhav

मुंबई | Mumbai

सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येप्रकरणी त्याच्या चाहत्यांनी तसेच बिहारचे माजी खासदार पप्पू यादव, अभिनेते शेखर सुमन, रूपा गांगुली, भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी आणि त्याची मैत्रीण रिया चक्रवर्तीने या प्रकरणाची चौकशी सीबीआय मार्फत करण्यात यावी अशी मागणी केली होती.

एका हिंदी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, सीबीआय चौकशीची मागणी महाराष्ट्रचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फेटाळून लावली आहे. गृहमंत्री देशमुख बोलतांना म्हणाले, "माझ्याकडे या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याबाबत अनेक ट्वीट होती पण मला असे वाटते की सीबीआय चौकशीची गरज नाही. मुंबई पोलिस हे प्रकरण सोडवतील. पोलिस प्रत्येक बाजूने तपास करत आहेत. तपास पूर्ण होताच, त्याच्या अंतिम अहवालाची माहिती आपल्यापर्यंत पोचवली जाईल." असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com