मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताच्या या सौंदर्यवतीचा सोनपरी' अवतार होतोय व्हायरल

मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताच्या या सौंदर्यवतीचा सोनपरी' अवतार होतोय व्हायरल

71 वी मिस युनिव्हर्स स्पर्धा (Miss Universe 2023) सध्या न्यू ऑर्लीन्स शहरात पार पडत आहे. भारताची दिविता राय (Divita Rai) मिस युनिव्हर्स 2023 स्पर्धेत प्रतिनिधित्व करत आहे.

दिविता रायने मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना गुरुवारी सोनपरी अंदाजात दिसली. 'सोने की चिडीया' अशी दिविताच्या कॉस्ट्यूमची थीम होती.

मिस युनिव्हर्स 2023 स्पर्धेत कर्नाटकातील मॉडेल दिविता रायच्या हाती भारताची कमान आहे. या स्पर्धेत 86 देशाच्या सौंदर्यवतींनी सहभाग घेतला आहे.

दिविता सोनेरी पंख पसरवत "सोने की चिडिया"च्या अवतारात स्टेजवर पोहोचली. तिचा हा लूक सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

भारताला एकेकाळी 'सोने की चिडिया' म्हणजे सोनेरी पक्षाची उपमा दिली जायची. मिस युनिव्हर्स स्पर्धेत राष्ट्रीय पोशाख फेरीसाठी दिविता रायने 'सोने की चिडिया' ची वेशभूषा केली होती

मिस युनिव्हर्स 2023 स्पर्धेची अंतिम फेरी 14 जानेवारी रोजी रात्री पार पडणार आहे. भारतीय वेळेनुसार, हा कार्यक्रम 15 जानेवारी रोजी सकाळी 6.30 वाजता पाहता येईल. भारतात हा कार्यक्रम JKN 18 हे चॅनेल आणि युट्यूबवर पाहता येईल. तसेच VOOT वर ऑनलाईनही हा कार्यक्रम पाहता येईल

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com