Sunday, April 28, 2024
HomeमनोरंजनParineeti- Raghav Wedding : ठरलं तर मग! राघव- परिणीती ‘या’ दिवशी उदयपुरमध्ये...

Parineeti- Raghav Wedding : ठरलं तर मग! राघव- परिणीती ‘या’ दिवशी उदयपुरमध्ये बांधणार लग्नगाठ

दिल्ली | Delhi

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आपचे खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) यांची सध्या जोरदार लगीनघाई सुरु असल्याचे बघायला मिळत आहे. अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाचा अखेर शुभमुहूर्त ठरला आहे. अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा शुभविवाह २३ आणि २४ सप्टेंबर दिवशी पार पडणार आहे. या दोघांनी डेस्टिनेशन वेडींगसाठी राजस्थान राज्याची निवड केली आहे. दोघांच्या लग्नाचे सेलिब्रेशन जवळपास आठवडाभर चालणार असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीप्रमाणे, परिणीती- राघव यांच्या लग्नाकरिता उदयपूरमधल्या हॉटेल लीला पॅलेस (Hotel Leela Palace) आणि उदयविलास हॉटेल (Hotel Udayavilas) ची बुकिंग करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. २३ आणि २४ सप्टेंबरला उदयपूरमधील सितारा हॉटेलमध्ये लग्नगाठ बांधणार असल्याची माहिती मीडिया रिपोर्टमधून समोर आली आहे. सोबतच, उदयपूरमधील हॉटेल लीला पॅलेस आणि हॉटेल उदयविलास येथे लग्नाचे विधी पार पडणार असून त्याच हॉटेलमध्ये पाहुण्यांच्या राहण्याची सोय करण्यात आली आहे.

राघव- परिणीती यांच्या लग्नाला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आणि देशातील अनेक राजकीय मंडळी देखील त्यांच्या लग्नाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. परिणीती- राघवचे लग्न २३ आणि २४ सप्टेंबरला होणार असून त्यांच्या लग्नासाठी पाहुणे २२ तारखेपासूनच उपस्थिती लावणार आहेत. २३ सप्टेंबरपासून मेहंदी, हळदी आणि संगीताच्या कार्यक्रमाला सुरू होणार असून २४ सप्टेंबरला दोघेही लग्नगाठ बांधणार आहेत. राघव आणि परिणिती यांनी त्यांच्या पाहुण्यांसाठी काही पर्यटन उपक्रमही आखले असून सुरक्षाही कडक असेल. काही दिवसांपूर्वी राघव आणि परिणीती उदयपूरला तयारीचा आढावा घेण्यासाठी गेले होते. तेथून परतल्यानंतर ते दिल्ली विमानतळावर दिसले.

परिणीतीच्या वेडिंग लूकबद्दल बोलायचे तर ती मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला लेहेंगा घालणार आहे. रोका सोहळ्यात तिने मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला ड्रेसही परिधान केला होता. मनीषच्या घराबाहेरही ती अनेकदा स्पॉट झाली होती. अभिनेत्रीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती इम्तियाज अलीच्या ‘चमकिला’मध्ये दिलजीत दोसांझसोबत दिसणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या