Monday, April 29, 2024
Homeमनोरंजनउत्कट प्रेमकथा असलेला 'जिद्दारी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

उत्कट प्रेमकथा असलेला ‘जिद्दारी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई | Mumbai

शेतकरी (Farmers) हा जगाचा पोशिंदा आहे, शेती पिकली, शेतकरी जगाला तरच जगरहाट सुरू राहणार हे वास्तव आहे. मात्र शेती (Agriculture) आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाष्य, ग्रामीण भागातील महिलांचे सबलीकरण आणि एक उत्कट प्रेमकथा यांचा त्रिवेणी संगम असलेला ‘जिद्दारी’ (jiddari) हा मराठी चित्रपट (Marathi Movie) येत्या शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 18 फेब्रुवारी 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे…

- Advertisement -

चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक अमोल आबासाहेब शिंदे होळकर (Amol Abasaheb Shinde Holkar) म्हणाले की, ‘जिद्दारी’ म्हणजे जिद्द. हा चित्रपट शेतकऱ्यांच्या समस्यांवर भाष्य करत असला तरी त्यामध्ये महिला सबलीकरण आणि एक सुंदर अशी प्रेमकथा सुद्धा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. या चित्रपटात विदुला बाविस्कर, शुभम तारे, विजय अंजान, रवींद्र सोळंके, रवींद्र ढगे, सुधीर माले, राजश्री पठारे, जयश्री सोनवणे यांच्या भूमिका आहेत.

ए. आर. माइंडस प्रॉडक्शन प्रस्तुत ‘जिद्दारी’ या मराठी चित्रपटाची निर्मिती दीप्ती जाधव शेंदारकर यांची आहे. संगीत दिग्दर्शक देव-सुचिर यांनी सुहास मुंडे, निखिल राजवर्धन यांच्या गीतांना संगीतबद्ध केले आहे तर ‘जिद्दारी’ मधील गीते आदर्श शिंदे, स्वप्नील बांदोडकर, सोनिया उपाध्याय, अतुल जोशी, राजलक्ष्मी शेंदारकर यांनी आपल्या सुरेल आवाजात गायली आहेत.

‘जिद्दारी’च्या निर्मात्या दीप्ती जाधव शेंदारकर म्हणाल्या की, आमचा चित्रपट महिला, शेतकरी यांचे एक वेगळे कथानक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यामध्ये मराठवाड्याची पार्श्वभूमी दाखवण्यात आलेली आहे.

चित्रपटाचे कार्यकारी निर्माता अभिजीत कांबळे आहेत, संकलन अमोल निंबाळकर, पूजा पाटील यांनी केले आहे, तर कला दिग्दर्शनाची जबाबदारी ज्ञानेश अ. शिंदे, सूरज स. शिंदे यांनी सांभाळली आहे. ‘जिद्दारी’ च्या ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारा हा वेगळ्या धाटणीचा चित्रपट येत्या 18 फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या