The Kashmir Files : चित्रपटाची सर्वत्र चर्चा; पहिल्या सहा दिवसांतच छप्पर फाड कमाई

The Kashmir Files : चित्रपटाची सर्वत्र चर्चा; पहिल्या सहा दिवसांतच छप्पर फाड कमाई

मुंबई | Mumbai

'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. या चित्रपटाने ओटीटी प्लॅटफॉर्म (Platform) राज्य करीत पहिल्या सहा दिवसातच करोडोंची कमाई केली आहे. काश्मीरमध्ये (Kashmir) झालेला नरसंहार आणि काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचार या चित्रपटात दाखवण्यात आला आहे...

दि. ११ मार्चला हा चित्रपट (Movie) प्रदर्शित झाला. सिनेमागृहात पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. या चित्रपटाने आतापर्यंत सुमारे ७९ कोटी २५ लाख रुपयांची कमाई (Earnings) केली आहे. तसेच हा चित्रपट १०० कोटींच्या कमाईचा टप्पा पार करेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, भाजपा (BJP) शासित राज्यात द कश्मीर फाइल्स (The Kashmir Files) हा सिनेमा टॅक्स फ्री करण्यात आला आहे. तर काँग्रेसने (Congress) या सिनेमावरून भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. सिनेमागृहात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या ‘द काश्मीर फाइल्स’वर (The Kashmir Files) पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही (PM Narendra Modi) भाष्य केले आहे. चित्रपटाबाबत अनेक संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

चित्रपटाने केलेली कमाई अशी

शुक्रवार : ३.५५ कोटी

शनिवार : ८.५० कोटी

रविवार : १५.१० कोटी

सोमवार : १५.०५ कोटी

मंगळवार : १८ कोटी

बुधवार : १९ कोटी

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com