Sunday, April 28, 2024
Homeजळगाव"लास्ट फिल्म शो" चित्रपट बुसान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये प्रदर्शित

“लास्ट फिल्म शो” चित्रपट बुसान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये प्रदर्शित

फैजपूर – प्रतिनिधी Faizpur

दक्षिण कोरिया (South Korea) येथील बुसान शहरात आजपासून सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय (Film Festival) चित्रपट महोत्सवात हेमंत अनिल चौधरी (Hemant Chaudhary) यांनी निर्मित केलेला “लास्ट फिल्म शो” (Last movie show) या चित्रपटाला ओपनिंग फिल्मचा बहुमान मिळाला असून त्या चित्रपटाचे आज प्रदर्शन झाले आहे.

- Advertisement -

हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आठ जुलै ते 17 जुलै दरम्यान आयोजित केलेला असून या महोत्सवात जगभरातील 75 देशातील 180 फिल्म ची स्क्रीनिंग साठी निवड झालेली आहे.

या महोत्सवाच्या ओपनिंग फिल्मचा बहुमान खान्देशचे (Khandesh) सुपुत्र हेमंत अनिल चौधरी यांच्या ‘लास्ट फिल्म शो’ या चित्रपटाला मिळाला असून आज त्याचे स्क्रीनिंग यशस्वीरित्या पार पडले आहे हा आपल्या संपूर्ण मराठी माणसांसाठी अतिशय आनंददायी क्षण आहे. हेमंत अनिल चौधरी मुळचे खिरोदा (Khiroda) येथील रहिवासी असून सध्या ते मालाड मुंबई येथे कार्यरत आहेत. त्यांच्या या फिल्मचे दिग्दर्शन श्री पान नलीन यांनी केलेले आहे.

या चित्रपटाची ओपनिंग फिल्म म्हणून निवड झालेल्याचे पत्र त्यांना महिन्याभरापूर्वीच मिळाले होते व ते सात जुलैला दक्षिण कोरिया साठी रवाना झाले.

हेमंत अनिल चौधरी हे विंध्य पेपर मिल दुसखेडाचे माजी फॅक्टरी मॅनेजर कै.अनिल चावदस चौधरी यांचे सुपुत्र असून (bhusawal) भुसावळ येथील प्रतिष्ठित नागरिक हरीष फालक यांचे भाचे आहेत. त्यांना मिळालेल्या या बहुमानाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या