ही अभिनेत्री दिसणार ‘नागिन’च्या भूमिकेत

श्रीदेवीची भूमिका आहे अजरामर
ही अभिनेत्री दिसणार ‘नागिन’च्या भूमिकेत

मुंबई - Mumbai

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनी ‘नागिन’ या सिनेमामध्ये केलेली भूमिका अजरामर आहे. अशीच भूमिका साकारण्यासाठी...

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. आणि विशेष म्हणजे श्रद्धा नागिणीच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे.

फिल्ममेकर निखिल द्विवेदी लवकरच नागिणीवर आधारित असलेला एक सिनेमा बनवणार आहेत. श्रद्धाने ही फिल्म करण्यास होकार दिला आहे. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनी ‘नागिन’ या सिनेमामध्ये केलेली भूमिका अजरामर आहे. त्यामुळे श्रद्धालाही आपल्या करिअरमध्ये अशी भूमिका साकारायची होती अशी भावना तिने व्यक्त केली आहे.

या आधी श्रीदेवी, रेखा आणि रीना रॉय यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्रींनी मोठ्या पडद्यावर नागिण साकारली होती. आता श्रद्धा कपूरला ही संधी मिळाली आहे. 2018 मध्ये श्रद्धा कपूरने स्त्री या चित्रपटात साकारलेली भूमिका देखील काहीशी वेगळ्या धाटणीची होती. तिने साकारलेल्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com