अब जंग होगी! कंगनाच्या 'Tejas' सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

अब जंग होगी! कंगनाच्या 'Tejas' सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

दिल्ली | Delhi

बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) सध्या 'तेजस' (Tejas) या सिनेमामुळे चर्चेत आहे. आज वायुसेना स्थापना दिनानिमित्त (Indian Air Force Day 2023) या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. 'तेजस' या सिनेमाचा ट्रेलर कंगनाने शेअर केला आहे.

या ट्रेलरमध्ये कंगना एका शुर आणि शक्तिशाली वायुसेनेची पायलट तेजस गिलची भुमिका साकारत आहे. या चित्रपटातील "भारत को छेडोगे तो छोड़ेंगे नहीं" अशाप्रकारचे अप्रतिम संवाद सर्वांना आकर्षित करतात. जबरदस्त साउंडट्रॅक आणि व्हिज्युअल इफेक्ट्ससह हा धमाकेदार ट्रेलर रिलिज झाला आहे. हा एक विजुअल स्पेक्टिकल चित्रपट ठरणार आहे. चित्रपटातील जबरदस्त संवाद देशभक्तीची भावना जागृत करतो. वीर वायुसेनेच्या पायलटच्या कंगना मोठ्या पडद्यावर तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत आहे.

'तेजस' या सिनेमात कंगना आणि वरुण मित्रा यांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळणार आहे. सर्वेश मेवाडा यांनी या सिनेमाची कथा लिहिली असून दिग्दर्शनाची धुराही सांभाळली आहे. 'तेजस' या सिनेमात कंगना मध्यवर्ती भूमिकेत आहे. ट्रेलर पाहून प्रेक्षकांची सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com