सुशांत आत्महत्या प्रकरणी "या" दिग्दर्शकाचा जबाब घेणार
मनोरंजन

सुशांत आत्महत्या प्रकरणी "या" दिग्दर्शकाचा जबाब घेणार

सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीचे या दिग्दर्शकासोबत जवळचे संबंध

Nilesh Jadhav

मुंबई | Mumbai

सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येचा तपास वेगवेगळे वळणे घेत आहे. या आधी मुकेश छाबरा, संजय लीला भन्साळी, आदित्य चोप्रा, शेखर कपूर आणि राजीव मसंद या लोकांची चौकशी या पूर्वीच करण्यात आली आहे. आता मुंबई पोलिस चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या सोबतच करण जोहरच्या मॅनेजरला देखील त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी बोलवणार असल्याची माहिती एका हिंदी वृत्त वाहिनीने दिली आहे.

सुशांतने आत्महत्या केल्यापासून महेश भट्ट सुशांतच्या चाहत्यांच्या निशाण्यावर आहे. तसेच सुशांतच्या मृत्यूमध्ये त्यांचा समावेश असल्याचा आरोप अनेक चाहत्यांनी केला आहे. तसेच सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती सोबत महेश भट्ट यांचे जवळचे संबंध असल्याचा आरोप देखील चाहत्यांनी केला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com