सुशांतसिंह राजपूतच्या सामाजिक कार्याचा कॅलिफोर्निया विधानसभेकडून गौरव
मनोरंजन

सुशांतसिंह राजपूतच्या सामाजिक कार्याचा कॅलिफोर्निया विधानसभेकडून गौरव

सुशांतची बहिण श्वेता सिंह कीर्तीने स्वीकारला पुरस्कार

Nilesh Jadhav

मुंबई | Mumbai

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत Sushant Singh Rajput याने केलेल्या विविध सामाजिक कार्याची दखल घेत व भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचीत्य साधत कॅलिफोर्निया राज्य विधानसभेने California State Assembly सुशांत सिंह राजपूतला मरणोत्तर पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. सुशांतची बहिण श्वेता सिंह कीर्तीने shweta singh kirti हा पुरस्कार स्वीकारला असून याबाबत Twitter वर माहिती दिली आहे.

श्वेता सिंह कीर्तीने Twitter वर फोटो अपलोड करत म्हंटले आहे, "स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कॅलिफोर्नियाने माझ्या भावाचा म्हणजेच सुशांत सिंग राजपूतचा सन्मान केला आहे. कॅलिफोर्निया आमच्या सोबत आहे…तुम्ही आहात का? कॅलिफोर्नियाने आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद.”

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com