सुशांतप्रकरणाचे दुबई कनेक्शन

प्रोफेशनल किलर्सने केली हत्या?
अभिनेता सुशांत सिंह
अभिनेता सुशांत सिंह

नवी दिल्ली |New Delhi -

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचे दुबईमधील काही व्यक्तींशी संबंध असल्याची शक्यता भाजपाचे खासदास सुब्रमण्यम स्वामी यांनी व्यक्त केली आहे. BJP MP Subramanian Swamy

दुबईमध्ये बसलेले पैशांचा काळाबाजार करणारे (मनी लॉन्डरर्स) आणि सुपार्‍या घेऊन हत्या करणार्‍यांचा (प्रोफेशनल किलर्स) या प्रकरणामध्ये सहभाग असू शकतो. त्यांचा हा प्रकरणात सहभाग असल्याची शक्यता नाकारता येणार नाही असं मत स्वामी यांनी व्यक्त केलं आहे. एका वृत्तवाहिनीच्या चर्चासत्रामध्ये ते बोलत होते. sushant singh rajput death case

यावेळी स्वामी यांनी प्रत्येक गुन्ह्यामध्ये काही ना काही पुरावा असतोच असं मत व्यक्त केलं. तसेच या गुन्ह्याच्या तपासामध्ये अनेक चूका झाल्याची टीकाही त्यांनी केली आहे. याचवेळी बोलताना त्यांनी सुशांतच्या हत्येचा दुबईतील काही व्यक्तींशी संबंध असू शकतो अशी शक्यता बोलून दाखवली. यापूर्वी 16 ऑगस्ट रोजी स्वामी यांनी केलेल्या एका ट्विटमध्ये सुशांतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाली आहे असं मत व्यक्त केलं होतं. स्वामी यांच्याबरोबरच भारतीय गुप्तहेर संस्था रॉचे (रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसिस विंग) माजी अधिकारी एन. के. सूद यांनाही सुशांत प्रकरणाचा अंडरवर्ल्डशी संबंध असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. अंडरवर्ल्डमधील गुन्हेगार हे अगदी चालाख असतात. ते त्यांचं काम करतात आणि नंतर लक्ष इतर गोष्टींकडे वळवण्याचा प्रयत्न करतात असं सूद म्हणाले.

यापूर्वीही स्वामी यांनी जुलै महिन्यामध्ये थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून या प्रकरणाचा दुबईमधील व्यक्तींशी संबंध असल्याबद्दलची शक्यता व्यक्त करत सीबीआय चौकशीची मागणी केली होती. पत्रात त्यांनी मुंबईतील आपल्या सुत्रांकडून सुशांतचा मृत्यू आत्महत्या दाखवत प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा केला होता. तसंच बॉलिवूडमधील अनेक मोठे सेलिब्रेटी दुबईमधील डॉनच्या मदतीने मुंबई पोलिसांना प्रकरण मिटवायला सांगत, ही ऐच्छिक आत्महत्या असल्याचं दाखवण्यास सांगत आहेत असंही त्यांनी या पत्रात म्हटलं होतं.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com