Thursday, April 25, 2024
Homeमनोरंजनसुशांतप्रकरणी अंमलीपदार्थ विरोधी पथकाकडून गुन्हा दाखल

सुशांतप्रकरणी अंमलीपदार्थ विरोधी पथकाकडून गुन्हा दाखल

मुंबई | Mumbai –

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी अंमलीपदार्थ विरोधी पथकाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

अभिनेत्री रियासह तिच्या साथीदारांविरोधात हा गुन्हा दाखल केला गेला आहे. सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिच्या व्हॉट्सअप चॅटवरुन तिचा ड्रग्ज डिलर्सशी संपर्क असल्याचे नुकतेच समोर आले आहे. तसेच तिने सुशांतलाही ड्रग्ज सेवनासाठी प्रवृत्त केल्याची चर्चा आहे.

सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात दिवसागणिक नवे खुलासे होत आहेत. सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती संदर्भात नुकताच अमंली पदार्थ सेवनाबाबतचा नवा मुद्दा समोर आला आहे. याबाबत ईडीने रियाचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट नुकतेच सीबीआयसोबत शेअर केले होते. नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोनं यामध्ये ड्रग्जचा वापर आणि व्यापार झाल्याचा ठपका ठेवला होता. रियाच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमधून ती एमडीएमए, हशिश आणि मारीजुना नवाच्या ड्रग घेत असल्याचं समोर आलं आहे. त्याचबरोबर सुशांतलाही तीने याचं सेवन करण्याबाबत सूचना केल्याचं बोललं जात आहे. Sushant Singh Rajput death case Narcotics Control Bureau files case against Rhea Chakraborty

दरम्यान, मंगळवारी रियाच्या वकिलांनी यासंदर्भात एक स्टेटमेंट प्रसिद्ध केलं यामध्ये रियानं आजपर्यंत आपल्या जीवनात कधीही ड्रग्ज घेतले नाहीत, असं म्हटलं आहे. तसेच रिया कधीही आपल्या रक्ताची चाचणी करण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे.

कंगनाचा हल्लाबोल

दरम्यान, कंगना राणावतने सुशांतसिंह प्रकरणी समोर आलेल्या ड्रग प्रकरणावरुन बॉलिवूडवर हल्लाबोल केला आहे. तिने ट्विट करत म्हटलं की, जर नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोची बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली तर अनेक ए लिस्टर्स (बडे फिल्ममेकर्स) तुरुंगात असतील. जर या सर्वांच्या रक्ताची चाचणी केली तर अनेक धक्कादायक खुलासे होतील. आशा आहे की, पीएमओ स्वच्छ भारत अभियानातंर्गत बॉलिवूड नावाचं हे गटार साफ करेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या