सुशांतप्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर पुढील कार्यवाही – देशमुख

गोंदिया | Gondiya –

अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा, अशी मागणी होत आहे. या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देणार की, मुंबई पोलीस करणार, असा प्रश्न माध्यमांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना विचारला. यावर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पुढील कार्यवाही होईल, असे देशमुख यांनी सांगितले. Sushant Singh Rajput death case

गृहमंत्री देशमुख शनिवारी गोंदिया येथे ध्वजारोहणासाठी आले होते. त्यावेळी त्यांना सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाविषयी विचारण्यात आले. यावर बोलताना सुशांतसिंह प्रकरणात सर्वांनी आपापले म्हणणे मांडले आहे. ही प्रतिज्ञापत्रे सर्वोच्च न्यायालयाकडे दिली आहेत. न्यायालयाचा निर्णय पुढील आठवड्यात येणार असून त्यांच्या आदेशानुसार पुढील निर्णय घेतला जाईल, सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची आम्ही वाट बघत आहोत. जसा निर्णय येईल, त्याप्रमाणे आम्ही कार्यवाही करू , असे देशमुख म्हणाले.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *