Thursday, April 25, 2024
Homeमनोरंजनसुशांतप्रकरणी संजय राऊत, मुंबई पोलीस आयुक्तांविरोधात तक्रार

सुशांतप्रकरणी संजय राऊत, मुंबई पोलीस आयुक्तांविरोधात तक्रार

मुंबई | Mumbai –

अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह मुंबई महानगरपालिकेच्या महापौर, पालिका पदाधिकारी आणि मुंबई पोलीस आयुक्त यांच्याविरोधात पाटण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसंच या तक्रारीमध्ये तपास आणि त्यांच्या अटकेची मागणीही करण्यात आली आहे. हिंदुस्तानी अवाम मोर्चाचे (एचएएम) प्रवक्ते दानिश रिझवान यांनी पाटणा पोलिसांना एक ईमेल लिहून ही तक्रार दाखल केली आहे.

- Advertisement -

sushant singh rajput case

सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणी एकीकडे सीबीआय तपास सुरु आहे. तर दुसरीकडे सुशांतच्या जवळील व्यक्ती त्याच्याशी निगडीत गोष्टींचा खुलासा करताना दिसत आहेत. तसंच गेल्या काही दिवसांपासून निरनिराळ्या व्यक्तींकडून काही वक्तव्यही केली जात आहेत. संजय राऊत यांनीदेखील सुशांत सिंग याच्या मृत्यूप्रकरणी काही वक्तव्य केली होती. तसंच त्यावर लेखही लिहिला होता.

काही दिवसांपूर्वी राऊत यांनी सुशांतच्या मृत्यूप्रकरणी एक वक्तव्य केलं होतं. सुशांतच्या वडिलांनी दुसरं लग्न केल्यामुळे त्याचे आणि त्याच्या वडिलांचं संबंध चांगले नव्हते, असं राऊत म्हणाले होते. तसंच सुशांत आणि अंकिता यांच्या ब्रेकअपच्याही तपासाचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. तर दुसरीकडे या प्रकरणावरून बिहार आणि महाराष्ट्र सरकारही समोरासमोर आल्याचं पाहायला मिळालं होतं. बिहार सरकारकडून या प्रकरणाच्या सीबीआय तपासाची मागणी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे ही आत्महत्या मुंबईत झाली असल्याचं सांगत बिहार पोलिसांना तपासाचा अधिकार नसल्याचं महाराष्ट्र पोलिसांचं म्हणणं आहे.

सुशांतच्या भावाची राऊत यांना नोटीस

अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा चुलत भाऊ नीरज कुमार याने संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. नीरजने संजय राऊत यांना 48 तासात जाहीर माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाईला तयार राहा असं नोटीसमध्ये म्हटलं आहे.

…तर मी माफी मागेन – राऊत

सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणी आमची काही चूक झाली, तर मी माफी मागेन, असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनीम्हटले आहे. त्याचबरोबर मुंबई पोलीस सक्षम असून तेच या प्रकरणाचा तपास करतील, असेही ते म्हणाले.

ते म्हणाले, या प्रकरणाला न्याय मिळो. मला सुशांतच्या कुटुंबीयांची काय मागणी आहे ते माहित नाही. मी संवेदनशील व्यक्ती आहे. मला जर वाटलं की आमची काही चूक झाली, तर मी माफी मागेन. मी माझ्या माहितीच्या आधारे बोललो आहे. त्यांचं कुटुंब त्यांच्या माहितीच्या आधारे बिहारमधून आरोप करतंय.फ तसेच काय करायचंय ते आम्ही आणि सुशांतचं कुटुंब पाहू. माध्यमांनी बोलायचं काही काम नाही. काही जण महाराष्ट्र सरकारला बदनाम करायचं काम करत आहेत. आगामी काळात हे कोण आहेत ते आम्ही सांगू, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या