Friday, April 26, 2024
Homeमनोरंजनसुशांतची आत्महत्या नव्हे, मनुष्यवध

सुशांतची आत्महत्या नव्हे, मनुष्यवध

मुंबई | Mumbai –

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या व्हिसेरा अहवालाची नव्याने तपासणी करण्याचा निर्णय अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात् एम्सने घेतला आहे. सुशांतची आत्महत्या नसून,

- Advertisement -

सदोष मनुष्यवधाचाच एक प्रकार असल्याचे मत एम्सच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

सुशांत प्रकरणाचा तपास एनसीबी, सीबीआय आणि ईडीकडून केला जात आहे. योग्य दिशेने व जलदगतीने तपास व्हावा, यासाठी एनसीबी आता नवे तपास पथक स्थापन करणार आहे. सुशांतचा शवविच्छेदन अहवाल आणि त्याच्या शरीरावरील खुणा पाहता, ही आत्महत्या नसल्याच्या निष्कर्षावर एम्सचे डॉक्टर आले आहेत. सुशांतवर विषप्रयोग झाला होता का, याची पाहणी करण्यासाठी सुशांतचा व्हिसेरा अहवाल पुन्हा एकदा तपासला जाणार आहेय.

17 सप्टेंबरला होणार बैठक

एम्सच्या डॉक्टरांची याच मुद्यावर महत्त्वाची बैठक 17 सप्टेंबरला होणार असल्याचे वृत्त एका वेबसाईटने दिले आहे. या बैठकीनंतर एम्सचे डॉक्टर आपला अहवाल सादर करतील, शिवाय पुढचा तपास कसा करायचा, यावरही बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या