Wednesday, April 24, 2024
Homeमनोरंजनबॉलिवूड ड्रग पार्टी...आता दीपिका

बॉलिवूड ड्रग पार्टी…आता दीपिका

मुंबई Mumbai-

अभिनेता सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणात एनसीबी ड्रग्स प्रकरणाचा तपास करत आहे. या तपासणीत बॉलिवूडमधील अनेक बड्या अभिनेत्रींनंतर नावे समोर आली आहेत. श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह आणि सारा अली खान या उगवत्या तारकांनंतर आता बॉलिवूडच्या क्वीनचे नाव समोर आल्याने बॉलिवूडचा चांगलाच धक्का बसला आहे.

- Advertisement -

नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (NCB) केलेल्या ड्रग्स प्रकरणाच्या तपासादरम्यान डी एन एस के (डी म्हणजेच दीपिका पादुकोण, एन म्हणजे नम्रता शिरोडकर, एस- श्रद्धा कपूर आणि के-करिश्मा) यांचे नाव समोर आले आहे. दीपिका पादुकोणचे नाव समोर आल्याने बॉलिवूडला धक्का बसला आहे.

ड्रग चॅट

जया साहा कंपनीच्या मॅनेजर करिश्मा यांच्याशी दीपिका पादुकोणच्या ड्रग चॅटचा खुलासा झाला आहे. या चॅटचा एनसीबीने खुलासा केला आहे.

यात दीपिका पादुकोण आणि करिश्मा ड्रग्जबद्दल चॅट करत आहेत. तुमच्याकडे माल आहे काय? असा प्रश्न दीपिका करिश्माला करत आहे. करिश्माकडून ‘हो … पण घरी. मी वांद्रेमध्ये आहे’ असे उत्तर मिळते.

यावर करिश्मा एका अमितचे नाव घेते आणि म्हणते की मी अमितला पाठवू शकते. यावर दीपिका म्हणाली- हो, प्लीज

काही काळानंतर करिश्मा म्हणाली, अमित घेऊन जात आहे. यावर दीपिका विचारते – हॅश आहे का? पण करिश्मा म्हणतो की, हॅश गांजा नाही.

बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन उघडकीस आणणार्‍या एनसीबीने जया साहा, तिच्या कंपनीचे मॅनेजर करिश्मा आणि सुशांतची मॅनेजर श्रुती मोदी यांना चौकशीसाठी बोलावले. या चौकशीत काही मोठे खुलासे झाले. श्रद्धा कपूरशिवाय तीन अभिनेत्रींच्या ड्रग चॅटसुद्धा समोर आल्या आहेत.

श्रद्धा कपूर आणि सीबीडी?

एनसीबीने जया साहाची चार तास चौकशी केली. या चौकशीत मादक पदार्थांविषयी खुलासे झाले आहेत. त्यातील एका चॅटमध्ये श्रद्धा कपूर जयाला सीबीडी तेलासाठी विचारत आहेत. सेलेब्रिटींना सीबीडी तेल कोठून मिळते, याचा तपास जया यांच्याकडून केला जात आहे.

अमित आणि एसएलबी ही नावे कोणाची आहेत, याचाही तपास सुरू आहे.

एका चॅटमध्ये एन नावाच्या अभिनेत्रीशी संवाद आहे. ती अभिनेत्री नम्रता शिरोडकर असल्याचे म्हटले जाते. जया साहा बॉलीवूडमधील किती सेलिब्रिटींना सीबीडी तेल पुरवते आणि हे सीबीडी तेल कोठून येते, याचा शोध एनसीबी घेत आहे.

सीबीडी तेल हे भांगेच्या वनस्पतीचा अर्क आहे. वेदना कमी करण्यासाठी तसेच चिंता कमी करण्यासाठी ते प्रभावी मानले जाते.

ड्रग्ज प्रकरणात रिया चक्रवर्तीने 25 बॉलिवूड सेलिब्रिटींची नावं घेतली आहेत. श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीतसिंग आणि सायमन खंबाटा यांची चौकशी करण्याची तयारी सुरू असताना आता दीपिकाचे नाव समोर आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या