
मुंबई | Mumbai
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्मिती डिझायनर आणि कला दिग्दर्शक सुनील बाबू यांचे वयाच्या ५० व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
चित्रपट निर्मात्या अंजली मेनन यांनी सुनिल बाबू यांच्या निधनाची माहिती दिली आहे. अभिनेता दुलकर सलमानने सोशल मीडियावर सुनिल बाबू यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी त्यांच्या पायाला सूज आली होती. म्हणून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान त्यांचं निधन झाल्यामुळे कलाविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
सुनील बाबू यांनी मल्याळम, तेलगू, तमिळ आणि हिंदीमध्ये कला दिग्दर्शक आणि प्रॉडक्शन डिझायनर म्हणूनही काम केले. त्यानंतर त्यांनी साबू सिरिल यांचे सहाय्यक म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. मिळालेल्या संधीचं त्यांनी सोनं केलं आणि अनेक पुरस्कार मिळावले.
बॉलीवूडमध्ये त्यांनी आमिर खान यांची भूमिका असलेला 'गजनी' चित्रपट आणि सुशांत सिंग राजपूतचा चित्रपट 'एम. 'एस धोनी'साठी पडद्यामागे प्रशंसनीय काम केले होते. गेल्या वर्षी साऊथचा हिट चित्रपट 'सीता रामम'साठी त्यांनी उत्तम काम केले होते. सुनीलच्या निधनाने चित्रपट कलाकारांना धक्का बसला असून त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला जात आहे.