Tuesday, April 23, 2024
Homeमनोरंजन...यामुळे थांबले The Batman चित्रपटाचे शूटिंग

…यामुळे थांबले The Batman चित्रपटाचे शूटिंग

दिल्ली | Delhi

The Batman या चित्रपटाची वाट चाहते अनेक दिवसांपासून बघत आहे. या चित्रपटात हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रॉबर्ट पॅटीन्सन(Robert Pattinson) हा देखील काम करत आहे. मात्र

- Advertisement -

अभिनेता रॉबर्ट पॅटीन्सनला देखील करोनाची लागण झाली आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, रॉबर्ट पॅटीन्सनने करोनाची चाचणी केली होती. या चाचणीचा अहवाल पॉसिटीव्ह आला आहे. रॉबर्टला कोरोना झाल्यामुळे आगामी सिनेमा ‘द बॅटमॅन’चं शूटींग थांबवण्यात आले आहे.

The Batman प्रोडक्शनमधील एका सदस्याला करोनाची बाधा झाली होती. त्यावेळी शूटींग थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर एक १ सप्टेंबरपासून शूटींगला पुन्हा सुरुवात करण्यात आली होती. मात्र आता रॉबर्टला करोनाची लागण झाल्याचं समोर येताच पुन्हा एका शूटींग थांबवण्यात आलं आहे.

The Batman या सिनेमात रॉबर्ट मुख्य म्हणजेच बॅटमॅनची भूमिका साकारत आहे. फेब्रुवारीमध्ये रॉबर्टचा बॅटमॅनमधील लूक प्रसिद्ध करण्यात आला होता. या सिनेमाचे दिग्दर्शक मॅट रिव्ह यांच्या सांगण्यानुसार, अजून सिनेमाचं ३ महिन्यांचं शूटींग होणं बाकी आहे. हे शूटींग वर्षाअखेरीपर्यंत संपवण्याचा आम्ही विचार करतोय.

- Advertisment -

ताज्या बातम्या