Wednesday, April 24, 2024
Homeमनोरंजनआगामी हिंदी चित्रपट 'जुग जुग जियो'चे शूटिंग थांबवले, कारण..

आगामी हिंदी चित्रपट ‘जुग जुग जियो’चे शूटिंग थांबवले, कारण..

दिल्ली | Delhi

‘जुग-जुग जियो’ या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण सध्या चंदीगडमध्ये सुरु आहे. मात्र आता चित्रीकरण थांबवण्यात आले आहे. कारण

- Advertisement -

जुग जुग जियो या चित्रपटातील प्रमुख कलाकारांनाच करोनाची लागण झाल्याने तात्काळ या चित्रपटाचे शूटिंग थांबविण्यात आले आहे. दरम्यान वरुण, अनिल कपूर आणि नीतू सिंह सह या चित्रपटाचे निर्माते राज मेहता हे देखील करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तथापि या चित्रपटाच्या निर्मात्यांनी याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.

‘जुग जुग जियो’ चित्रपटात एक फॅमिली ड्रामा दाखवण्यात येणार आहे. ज्याची निर्मिती करण जोहर करणार आहे. अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनानंतर नीतू कपूर ‘जुग जुग जियो’ या चित्रपटातून पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. जर नीतू कपूर यांच्याबाबत बोलायचं झालं तर, त्याचा आगामी चित्रपट ‘कुली नं 1’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती वरुण धवनचे वडील डेविड धवन यांनी केली आहे. या चित्रपटात वरुण धवनसोबत साला अली खान स्क्रिन शेअर करणार आहे.

वरुण धवन आणि कियारा अडवाणी हे दोघेही या चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. यापूर्वी ही जोडी धर्मा प्रॉडक्शनच्या ‘कलंक’ या चित्रपटातील एका गाण्यामध्ये दिसली होती. ‘जुग जुग जिओ’ चित्रपटात कियारा अडवाणी आणि वरुण धवन व्यतिरिक्त बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर आणि अभिनेत्री नीतू कपूर देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

दिग्दर्शक राज मेहता या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री नीतू सिंह यांनी नुकतेच चित्रीकरणादरम्यान सेटवरील त्यांचा एक सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर केले होता. या फोटोत नीतू शॉटसाठी तयार होताना दिसल्या होत्या. ऋषी कपूर यांच्या निधनानंतर नीतू कपूर पहिल्यांदाच चित्रीकरण करत आहेत. नीतूला पुन्हा एकदा स्क्रीनवर पाहून चाहते खूप आनंदित झाले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या