Friday, April 26, 2024
HomeमनोरंजनSSR case : AIIMS च्या डॉक्टरांनी केला मोठा खुलासा

SSR case : AIIMS च्या डॉक्टरांनी केला मोठा खुलासा

दिल्ली | Delhi

AIIMS च्या डॉक्टरांच्या एका पॅनलने सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणातील अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार,

- Advertisement -

सुशांत सिंह राजपूत याची हत्या झालेली नाही तर ती आत्महत्याच असल्याचे म्हटले आहे. एम्सच्या डॉक्टरांनी दिलेल्या या अहवालामुळे आता सीबीआयचं पथक आत्महत्येच्या अँगलने या प्रकरणाचा तपास करेल.

AIIMS च्या डॉक्टरांनी सुशांत सिंह राजपूतची हत्या झाली असावी, या थेअरीला नकार दिला आहे. सुशांतची हत्या झाली नाही, असं या डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. सुशांतच्या कुटुंबियांनी आणि त्याच्या वकिलांनी सुशांतला आधी विष देऊन मारले आणि नंतर गळफास देण्यात आला असा आरोप केला होता. पण AIIMS च्या डॉक्टरांनी या प्रकरणाचा पूर्ण तपास केला. सुशांतच्या गळ्यावर असलेले मार्क आणि शवविच्छेदनात स्पष्ट करण्यात आलेली मृत्यूची वेळ व इतर तथ्यांनुसार, सुशांतची हत्या झाली असावी असं म्हणता येणार नाही, असं डॉक्टरांच्या टीमने स्पष्ट केले आहे.

14 जून रोजी सुशांत सिंह राजपूतने मुंबईतील वांद्रे परिसरातील आपल्या राहत्या घरात गळफास घेतला होता. सुरुवातील या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी केला होता. मुंबई पोलिसांनी सुशांतने आत्महत्या केली, असं स्पष्ट केले होते. परंतु, सुशांतने आत्महत्या केली नसून हत्या केली, असा आरोप कुटुंबीयांनी केला होता. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली होती. अखेर हा वाद सुप्रीम कोर्टात पोहोचला आणि सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाच्या तपासाला सीबीआयला परवानगी दिली. पण, आता या प्रकरणात एम्सच्या डॉक्टरांनीही सुशांतची हत्या झाली असावी, हे नाकारलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या