Thursday, April 25, 2024
Homeमनोरंजनसोनू सूद गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीला

सोनू सूद गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीला

मुंबई | Mumbai –

बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने लॉकाऊनच्या काळात स्थलांतरीत मजुरांना स्वखर्चाने स्वगृही पोहचवले. आता त्याने आणखी एक नवी योजना

- Advertisement -

आणली आहे. या योजनेतून तो गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना मदत करणार आहे. उच्च शिक्षणासाठी त्याने स्कॉलरशिप देण्यासाठी पुढाकारा घेतला आहे.

लॉकडाऊनच्या काळात मुंबईमध्ये अनेक स्थलांतरीत मजूर, विद्यार्थी अडकले होते. रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक बंद असल्याने या स्थलांतरीतांना आपल्या घरी जाणं कठीण बनलं होतं. त्यामुळे अनेकजण पायीच आपल्या गावी जाण्यासाठी निघाले. मजुरांची ही अ्वस्था पाहून सोनू सुदने पुढाकार घेतला आणि या मजुरांना आपल्या गावी पोहोचवण्याची सोय केली. यानंतर त्याने बेरोजगार तरुणांनाही आधार दिला. तसंच, तो आता गरजू विद्यार्थ्यांकरता स्कॉलरशीप सुरू करणार आहे.

पैशांअभवी कोणीही शिक्षणापासून वंचिता राहू नये याकरता त्याने आपल्या आईच्या नावे स्कॉलरशिप सुरू केली आहे. त्याने याबात एक ट्विट करत म्हटलंय की, आपलं भविष्य आपली ताकत आणि मेहनतच सिद्ध करणार आहे. आपण कुठुन आलो, आपली आर्थिक स्थिती कशी आहे, याचा याच्याशी काही संबंध नाही. एक प्रयत्न आता मी करत आहे. शाळेनंतरच्या शिक्षणासाठी पूर्ण स्कॉलरशिप. ज्यामुळं तुम्ही आपलं उच्च शिक्षण पूर्ण करु शकाल, यासाठी scholarshipssonusood.me यावर मेल करा.

त्याने एक आणखी ट्वीट करत स्कॉलरशिपची घोषणा केली आहे. त्यात म्हटलं आहे की, हिंदुस्तान शिकेल तेव्हाच, जेव्हा शिक्षण चांगलं मिळेल, उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिप लॉन्च करत आहोत. मला विश्वास आहे की आर्थिक अडचणींमुळं आपलं ध्येय गाठण्यास अडचणी येऊ नयेत, आपली एंट्री scholarshipssonusood.me वर पाठवा, मी आपल्यापर्यंत पोहोचेल, असं सोनूनं म्हटलं आहे.

माहितीनुसार ही स्कॉलरशिप मेडिसिन, इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजेंस, रोबोटिक अँड ऑटोमेशन, सायबर सेक्युरिटी, डाटा सायन्स, फॅशन, पत्रकारिता आणि बिझनेस स्टडीज अशा काही कोर्सेससाठी असेल. स्कॉलरशिपसाठी काही अटी देखील असतील.

- Advertisment -

ताज्या बातम्या