सोनाली फोगट मृत्यू प्रकरणाचा तपास आता CBI करणार

सोनाली फोगट मृत्यू प्रकरणाचा तपास आता CBI करणार

मुंबई l Mumbai

सोनाली फोगाट खून (Sonali Phogat case) प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे. सोनाली फोगट खून प्रकरणाचा तपास सीबीआयकडे (CBI) सुपूर्त करणार असल्याचे गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी सांगितले आहे.

सोनाली फोगट यांच्या कुटुंबीयांनी गोवा पोलीस (Goa Police) आणि हरियाणा पोलीस (Hariyana Police) यांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. त्यामुळे फोगट यांच्या कुटुंबीयांकडून हा तपास सीबीआयकडे सुपूर्त करावा अशी मागणी वाढत चालली होती. त्यालाच अनुसरून आता हा तपास सीबीआयकडे सुपूर्त होणार आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी सांगितले की, 'आम्ही सोनाली फोगटचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. आमचा आमच्या पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे पण लोकांनी वारंवार मागणी केली आहे आणि त्यांच्या मुलीनेही हे प्रकरण सीबीआयने हाताळावे अशी मागणी केली आहे.'

दरम्यान, ड्रग्जच्या ओव्हर डोसमुळे सोनाली फोगट यांचा मृत्यू झाला असल्याचे गोवा पोलिसांनी म्हटले आहे. सोनाली यांनी गोव्यात पोहोचल्यानंतर थांबलेल्या हॉटेलातच जेवण केले होते. २२ ऑगस्ट रोजी रात्री ती पहिल्यांदा त्या रिसॉर्टबाहेर आल्या होत्या. त्यांनी कर्लीज रेस्टॉरंटमध्ये डिनर केला होता. त्यानंतर त्याच रात्री त्यांचा मृत्यू झाला होता.

फोगाट यांचा स्वीय सहायक सुधीर सांगवान आणि सचिव सुखविंदर सिंग पाल यांना आता या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. संशयित आरोपीने हणजूण येथील रेस्टॉरंटमधील पिण्याच्या पाण्यात विषारी पदार्थ मिसळल्याची कबुली दिली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com