Saturday, April 27, 2024
Homeमनोरंजनअभिमानास्पद! नाशिकच्या दिग्दर्शकाची शॉर्ट फिल्म 'इंडियन इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये'

अभिमानास्पद! नाशिकच्या दिग्दर्शकाची शॉर्ट फिल्म ‘इंडियन इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये’

नाशिक | Nashik

नाशिकच्या मनोरंजनक्षेत्राने (Entertainment) आपले नाव राष्ट्रीय पातळीवर पोहचविले आहे. येथील कलाकारांनी एक सामाजिक विषय घेऊन मनोरंजनातून समाज जागृती करण्याचा प्रयत्न केला आहे.

- Advertisement -

मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांच्या निर्मितीतून साकारलेली, डॉ. अभिजीत सावंत लिखीत आणि सोनू अहिरे (Sonu Ahire) दिग्दर्शित ‘इन साईड द शाडो’ (‘In Side the Shadow’) या लघुचित्रपटाची थेट राष्ट्रीय पातळीवरील इंडियन इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये (Indian International Short Film Festival) निवड झाली आहे.

लहान मुलांच्या अपहरणाच्या घटना, पालकांची सतर्कता, पोलीस प्रशासनाची (Police Administration) भूमिका आणि अशा अप्रिय घटना रोखण्यासाठी घ्यावयाची आवश्यक ती काळजी आदी महत्वाच्या मुद्द्याकांकडे हा लघुचित्रपट (Short film) लक्ष वेधतो.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

शिवसेना नाव आणि चिन्ह चोरीला गेल्याची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

यामध्ये रोचीता चव्हाण (Rochita Chavan) प्रमुख भूमिकेत असून, दिलीप वालकर, सुधीर सावंत, मकरंद शिंदे, भिकाजी पवार, वैभव पवार, यांनी दमदार भूमिका साकारल्या आहेत. राकेश तिवारी यांनी त्यांच्या चित्रीकरणातून या लघुचित्रपटात जीव ओतला आहे. निकेश श्रीवास्तव यांच्या कला कौशल्याने प्रत्येक पात्र अक्षरश: गंभीर आणि तितकेच बोलके झाले आहे.

मनोरंजन त्यातून समाजाचे उद्बोधन, समाजापर्यंत जाणारा उत्तम संदेश पण कुठेही तोल ढळू न देता कमी वेळात प्रेक्षकांच्या मनापर्यंत भिडणे ही किमया काही मोजक्याच प्रयोगांना साधता येते हे आव्हान ‘इन साईड द शाडो’ ने अचूक पेलले आहे असे दिसून येते ; म्हणूनच तर या लघुचित्रपटाने राष्ट्रीय पातळीवर महोत्सवात आपले स्थान निश्चित केले आहे, ही बाब नाशिकच्या (Nashik) मनोरंजनक्षेत्रासाठी अभिमानाची आहे असे म्हणावे लागेल.

धोनी…धोनी…! आयपीएलमध्ये घुमणार आवाज; यंदाचा हंगाम शेवटचा?

- Advertisment -

ताज्या बातम्या