Thursday, April 25, 2024
Homeमनोरंजनधक्कादायक! प्रसिद्ध मल्याळम अभिनेता अनिल नेडुमंगड यांचे निधन

धक्कादायक! प्रसिद्ध मल्याळम अभिनेता अनिल नेडुमंगड यांचे निधन

केरळ l Keral

प्रसिद्ध मल्याळम अभिनेता अनिल नेडुमंगड (Anil Nedumangad) यांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्येच एका फिल्मच्या शूटिंगसाठी ते गेले होते. त्या ठिकाणी धरणावर गेले असता धरणात बुडून त्यांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

अनिल नेडुमंगड एका फिल्मच्या शूटिंगसाठी आले होते. शुक्रवारी ते मलांकारा धरणावर (Malankara dam) गेले होते. मित्रांसोबत या धरणाच्या पाण्यात ते अंघोळीसाठी उतरले आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनानंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन यांनी ट्विट करत अनिल यांच्या निधनाची माहिती दिली आहे. “काहीच नाही. काय बोलावे सुचत नाहीये. माझ्याकडे शब्द नाहीयेत काही बोलायला. तुमच्या आत्मास शांती लाभो हीच अपेक्षा”, असं ट्विट पृथ्वीराज सुकुमारन यांनी केलं आहे.

अनिल यांना अय्याप्पनम कोशियम (Ayyappanum Koshiyum), कामाट्टीपदम (Kamattipaadam) आणि पावडा (Paavada) या फिल्मधील अभिनयासाठी ओळखलं जातं. ते टीव्ही अँकरही होते. निर्माते म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. २०१४ साली ते सिल्व्हर स्क्रिनवर झळकले.

दरम्यान मल्याळम चित्रपट सृष्टीला बसलेला हा दुसरा धक्का आहे. गुरुवारी मल्याळम दिग्दर्शक शानवास नारानिपुझा (Shanawas Naranipuzha) यांचं निधन झालं. दिल्लीतील एका स्थानिक रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

- Advertisment -

ताज्या बातम्या