अभिनेते शरद पोंक्षेंचा अंदमान कारागृहातील ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

अभिनेते शरद पोंक्षेंचा अंदमान कारागृहातील ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

मुंबई | Mumbai

मराठी सिनेसृष्टी आणि मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe Video) सोशल मीडियावर विशेष सक्रिय आहेत. केवळ मालिका किंवा चित्रपटच नव्हे तर राजकारण, समाजकारण, इतिहास याविषयी ते त्यांच्या पोस्टमधून भाष्य करतात.

नुकताच त्यांनी अंदमानच्या सेल्युलर जेलमधून एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यातून त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना टोला लगावला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान वीर सावरकरांचं नाव घेत टीका केली होती. त्यांच्या या वक्तव्याचा आता शरद पोंक्षे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. शरद पोंक्षे यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

राहुल गांधी यांचं विधान काय?

काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या सुरु आहे. ही यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. या यात्रेदरम्यान बोलताना राहुल गांधी यांनी सावरकरांवर टीका केली आहे. सावरकर इंग्रजांकडून पेन्शन घेत असल्याचं राहुल गांधी म्हणालेत. त्यांच्या या विधानानंतर भाजपकडून जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांनीही राहुल गांधींच्या विधानाचं समर्थन करत नसल्याचं सांगितलं आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com