Shah Rukh Khan birthday : 'किंग खान'च्या वाढदिवसानिमित्त 'मन्नत'बाहेर चाहत्यांकडून जंगी सेलिब्रेशन

Shah Rukh Khan birthday : 'किंग खान'च्या वाढदिवसानिमित्त 'मन्नत'बाहेर चाहत्यांकडून जंगी सेलिब्रेशन

मुंबई | Mumbai

'किंग खान' म्हणून ओखळ असलेल्या अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) आज 58 वा वाढदिवस. शाहरूखचा वाढदिवस त्याच्या चाहत्यांसाठी एखाद्या सणापेक्षा कमी नाही. दरवर्षीप्रमाणे यंदाही त्याच्या चाहत्यांनी 'मन्नत' बाहेर जोरदार सेलिब्रेशन केल्याचे दिसून आले.

शाहरूखला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी काल संध्याकाळपासूनच देशभरातील चाहते मन्नत बाहेर दाखल झाले. या चाहत्यांनी मन्नत बाहेर एकच जल्लोष करत दिवाळीप्रमाणे किंग खानच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन केले. चाहत्याचे प्रेम पाहून शाहरूख खान यावेळी भावुकदेखील झाला.

मन्नत बाहेरील सेलिब्रेशनचे व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहत्यांचे हे प्रेम पाहून किंग खानने मध्यरात्री सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसाठी एक खास मेसेज देत त्यांचे आभार मानले.

शाहरुख खानने २ नोव्हेंबरला पहाटे ३ वाजून १८ मिनिटांनी एक्स म्हणजेच ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चाहत्यांसाठी एक खास पोस्ट शेअर केली. या ट्विटमध्ये त्याने असे लिहिले आहे की, 'विश्वास बसत नाही की तुम्ही सगळ्यांनी रात्री उशिरा येऊन मला शुभेच्छा दिल्या. मी फक्त एक अभिनेता आहे. मला खूप आनंद आहे की तुमचे थोडेसे मनोरंजन करू शकतो. मी तुमच्या सगळ्यांच्या स्वप्नात राहतो. मला तुम्हा सर्वांचे मनोरंजन करण्याची परवानगी दिल्याबद्दल धन्यवाद.'

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Shah Rukh Khan birthday : 'किंग खान'च्या वाढदिवसानिमित्त 'मन्नत'बाहेर चाहत्यांकडून जंगी सेलिब्रेशन
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांची आज ईडीकडून चौकशी; म्हणाले,"चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत..."

वाढदिवसाच्या मध्यरात्री शाहरुख नेहमीप्रमाणे मन्नतच्या टेरेसवर आला. त्याला बघून त्याचे चाहते जोरजोरात ओरडत त्याला शुभेच्छा देत होते. शाहरुखसोबत त्याचा मुलगा अबराम देखील होता. शाहरुख टेरेसवर आल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी मोठ्याप्रमाणात फटाके फोडले. सध्या सोशल मीडियावर शाहरुख खान आणि त्याच्या घराबाहेरचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

Shah Rukh Khan birthday : 'किंग खान'च्या वाढदिवसानिमित्त 'मन्नत'बाहेर चाहत्यांकडून जंगी सेलिब्रेशन
लाचेची मागणी झाल्यास बिनधास्त तक्रार करा
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com