Saturday, April 27, 2024
HomeमनोरंजनBig Boss चे वादग्रस्त स्पर्धक 'स्वामी ओम' यांचे निधन

Big Boss चे वादग्रस्त स्पर्धक ‘स्वामी ओम’ यांचे निधन

दिल्ली l Delhi

Big Boss च्या दहाव्या पर्वातील स्पर्धक व वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले ओम स्वामी यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर दिल्लीतील एम्स मध्ये उपचार सुरु होते. आज त्यांचे निधन झाले.

- Advertisement -

करोनामधून बरे झाल्यानंतर स्वामी ओम यांना चालण्यास खूप त्रास होत, असल्याचे सांगितले जात होते. यानंतर त्यांच्या अर्ध्या शरीरावर अर्धांगवायू झाला ज्यामुळे गेल्या १५ दिवसांत त्याची प्रकृती अधिकच खराब झाली आणि आज (3 फेब्रुवारी) त्यांचा मृत्यू झाला.

बिग बॉस १० ने त्यांना ‘कॉन्ट्रोव्हिएशनल गुरू’ असे नाव दिले होते. स्वामी ओमवर सायकल चोरी केल्याचाही आरोप होता. त्यांना पोलिसांनी वेगवेगळ्या आरोपाखाली अटक केली होती. ‘बिग बॉस 10’ संपल्यानंतर दिल्लीच्या इंटर स्टेट क्राइम ब्रँचने भजनपुरा भागातून त्यांना अटक केल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. स्वामी ओम यांच्यावर चोरी करणे, हत्यारे बाळगणे आणि इतरांच्या घरात घुसणे, असे अनेक आरोप होते. त्यांच्याविरूद्ध अजामीनपात्र वॉरंट देखील जारी करण्यात आले होते.

तसेच, २०१७ मध्ये गोपनियतेसारख्या गंभीर मुद्द्यावर सुप्रीम कोर्टानं २४ ऑगस्ट २०१७ रोजी बिग बॉसमुळं चर्चेत आलेल्या स्वामी ओम यांना १० लाखांचा दंड ठोठावला होता. स्वामी ओम यांनी याचिकेत म्हटलं होतं की, हाय कोर्ट आणि सुप्रीम कोर्टात न्यायाधीशांची नियुक्ती करताना CJI कडून शिफारस का घेतली जाते. यावर CJI खेहर आणि जस्टीस डीवाय चंद्रचूड यांच्या खंडपीठाकडे ही केस आली तेव्हा कोर्टानं सांगितलं की, हा पब्लिसिटी स्टंट आहे. परंतु स्वामी ओम यांनी यावर उत्तर दिलं होतं की, बिग बॉसमधून त्यांनी आधीच पब्लिसिटी मिळवली आहे. या प्रकरणी गेल्या वर्षी कोर्टानं त्यांना १० लाखांऐवजी ८ हप्त्यात ५ लाख रुपये जमा करायला सांगितलं होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या