'दिल बेचारा' पाहून प्रसिद्ध गायिकेने केली "ही" मागणी
मनोरंजन

'दिल बेचारा' पाहून प्रसिद्ध गायिकेने केली "ही" मागणी

सुशांतसिंग राजपुतचा शेवटचा 'दिल बेचारा' चित्रपट काल प्रदर्शित झाला.

Nilesh Jadhav

सुशांतसिंग राजपूत यांचा 'दिल बेचारा' हा शेवटचा चित्रपट काल रात्री प्रदर्शित झाला. त्याचे चाहते तसेच अनेक बॉलिवुड स्टार्स व टीव्ही स्टार्स देखील या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत होते.

या चित्रपटात सुशांत सोबत संजना संघी, स्वस्तिक मुखर्जी, शाश्वता, साहिल वेद आणि सैफअली खान आहेत. मुकेश छाबरा यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.

courtesy : DNA India

हा चित्रपट प्रसिद्ध कादंबरीकार जॉन ग्रीन यांच्या ‘द फॉल्ट इन अवर स्टार्स’ या पुस्तकावर आधारित आहे. चित्रपटाची कहाणी, कलाकारांचा अभिनय आणि ए.आर. रहमान यांचे संगीत हृदयस्पर्शी आहे.

प्रसिद्ध गायिका नेहा कक्करने सुशांतसिंग राजपूतला राष्ट्रीय पुरस्कार देण्यात यावा असे तिने म्हंटले आहे. तसेच सुशांत सोबतच दिग्दर्शक मुकेश छाबरा आणि संजना संघीला देखील पुरस्कार द्यावा असे तिने म्हंटले आहे.

सुशांतसिंग राजपूतच्या चित्रपटावर सोशल मीडियावर प्रचंड प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रसिद्ध टीव्ही अभिनेता रवी दुबे यांनीही 'दिल बेचरा' पाहिल्यानंतर प्रतिक्रिया ट्विटद्वारे दिली आहे. त्याने ट्विटवर एक व्हिडिओ शेअर करत म्हंटले आहे, "सात जन्मांमध्येही कोणीच तुझ्यासारखे आशीर्वाद कमवू शकत नाहीत."

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com