
दिल्ली | Delhi
अभिनेते सतीश कौशिक यांचे ९ मार्च रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्यूच्या काही तास आधी त्यांनी एका होळी पार्टीला हजेरी लावली होती. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, त्यात एक मोठा खुलासा झाला आहे.
सतीश कौशिक ज्या ठिकाणी पार्टी करत होते त्या फार्म हाऊसमधून पोलिसांना काही आक्षेपार्ह औषधांची पाकिटे मिळाली आहेत. या औषधांचा सतीश कौशिक यांच्या मृत्यूशी संबंध आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. या माहितीमुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान प्राथमिक तपासणीत हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचं निधन झालं होतं. अशातच फार्महाऊसबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पण, त्याचा सतीश कौशिक यांच्या निधनाशी काही संबंध आहे की दोन्ही प्रकरणं वेगळी आहेत, याबद्दल स्पष्टता नाही.