‘समायरा’ उलगडणार एका असाधारण प्रवासाची गोष्ट

‘समायरा’ उलगडणार एका असाधारण प्रवासाची गोष्ट

ऋषी श्रीकृष्ण देशपांडे (Rushi Shrikrishna Deshpande) दिग्दर्शित 'समायरा' (Samayra) या चित्रपटाची नुकतीच सोशल मीडियावर (Social Media) घोषणा करण्यात आली आहे. येत्या २६ ऑगस्ट रोजी ‘समायरा’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पोस्टरमध्ये केतकी नारायण (Ketaki Narayan) अव्हेंजर चालवताना दिसत असून तिच्या चेहऱ्यावर एक ध्येय साध्य करण्याचा आत्मविश्वास दिसत आहे. तिच्या ध्येयापर्यंतचा हा असाधारण प्रवास आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळणार आहे....

प्रत्येक जण आयुष्य जगण्यासाठी एक प्रवास करत असतो. तसाच एक असाधारण प्रवास ‘समायरा’चाही असणार आहे. तिचा हा प्रवास तिचे ध्येय साध्य करणार का, हे लवकरच प्रेक्षकांना कळणार आहे. सध्या मराठी चित्रपटसृष्टीत अनेक नवनवीन विषय हाताळले जात आहेत. ही कथाही खूप वेगळी आहे. ‘समायरा’चा हा प्रवास प्रेक्षकांना नक्कीच सकारात्मकता देईल." असे ‘समायरा’चे दिग्दर्शक ऋषी देशपांडे (Rushi Deshpande) सांगतात.

या चित्रपटाची निर्मिती डॉ. जगन्नाथ सुरपूरे, रतन सुरपूरे, शशिकांत पनत, योगेश आळंदकर आणि ऋषी श्रीकृष्ण देशपांडे यांनी केली असून या चित्रपटाची पटकथा आणि संवाद सुमित विलास तांबे यांचे आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com