अर्ध्यावरती डाव मोडला... समंथा-नाग चैतन्य यांचा अखेर घटस्फोट, भावुक पोस्ट व्हायरल...

अर्ध्यावरती डाव मोडला... समंथा-नाग चैतन्य यांचा अखेर घटस्फोट, भावुक पोस्ट व्हायरल...

मुंबई | Mumbai

मनोरंजनविश्वातील काही नात्यांविषयी अचूक अंदाज बांधणं कठीण असतं. दशकाहून अधिक वर्षे लग्नबंधनात राहिल्यानंतरही सेलिब्रिटींनी घटस्फोट घेतल्याची उदाहरणं आपण पाहिली आहेत.

आता प्रसिद्ध दाक्षिणात्य कलाकार समंथा अक्किनेनी (Samantha Ruth Prabhu) आणि तिचा पती नाग चैतन्य (Naga Chaitanya) यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. नाग चैतन्यने ही बातमी सोशल मीडियावर एक पोस्ट करून दिली आहे. ही पोस्ट सोशल मीडियामध्ये आता चांगलीच व्हायरल झाली आहे.

नाग चैतन्यने म्हंटलं आहे की, 'आमच्या सर्व हिंतचिंतकांना सांगू इच्छितो, बऱ्याच विचारविनिमयांनंतर मी आणि चैतन्यने पती-पत्नी म्हणून आमचे मार्ग वेगळे करण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास दहा वर्षांहून अधिक काळ असलेल्या आमच्यातील मैत्रीसाठी आम्ही खूप नशिबवान आहोत. ही मैत्री आमच्या दोघांसाठी नेहमीच खास राहील. या कठीण काळात आमची साथ देण्यासाठी आम्ही चाहते, हितचिंतक आणि मीडियाला विनंती करतो. आयुष्यात पुढे जाण्यासाठी लागणारी प्रायव्हसी आम्हाला देण्याची आम्ही विनंती करतो',

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com