Friday, April 26, 2024
Homeमनोरंजनप्रतीक्षा संपली! सलमान खानचा राधे 'या' दिवशी होणार प्रदर्शित

प्रतीक्षा संपली! सलमान खानचा राधे ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

मुंबई | Mumbai

बॉलिवूडच्या भाईजान सलमान खान बहुप्रतिक्षीत ‘राधे-युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ (Radhe: Your Most wanted Bhai) या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख अखेर जाहीर झाली आहे. अभिनेता सलमान खानने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.

- Advertisement -

येत्या ईदच्या मुहुर्तावर मे महिन्याच्या १३ तारखेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमानने त्याच्या इन्स्टाग्राम आकाऊंटवरुन राधे सिनेमाचे पोस्टर शेअर केलं आहे. सध्या हे पोस्टर सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत पोस्टरला चाहत्यांकडून मोठी पंसती मिळत आहे.

सलमानने हे पोस्टर शेअर करत आपण ‘ईदची कमिटमेंट दिली होती. त्यामुळे ईदलाच तुम्हाला भेटायला येणार आहे.’ असे हटके कॅप्शन या पोस्टला दिले आहेत. सलमान खानने राधे चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करुन ‘ईद ची कमिटमेंट दिली होती, ईदला येणार. कारण एकदा मी जी….’ असे कॅप्शन दिले आहे.

राधे हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या आतुरतेनं वाट पाहत होतं. प्रभु देवा दिग्दर्शित हा अ‍ॅक्शन-ड्रामा 2021 मधील बहुप्रतिक्षित सिनेमा आहे. पण या चित्रपटाच्या नवीन पोस्टरमुळे चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण तयार झालं आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला अद्याप दोन महिने बाकी आहेत. सलमान खानचा हा राधे चित्रपट अ‍ॅक्शन, ड्रामा आणि मनोरंजनाने परिपूर्ण भरलेला आहे. या चित्रपटात सलमान खानसोबतचं दिशा पाटनी, रणदीप हूडा आणि जॅकी श्रॉफ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सलमान खान फिल्म्स आणि झी स्टुडिओने संयुक्तपणे या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या