रिया चक्रवर्तीच्या अडचणींमध्ये वाढ !

jalgaon-digital
1 Min Read

मुंबई | Mumbai

रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिला ड्रग रॅकेट प्रकरणात सत्र न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. सत्र न्यायालयाने रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक यांच्यासह सर्व आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

रिया चक्रवर्तीची (Rhea Chakraborty) न्यायालयीन कोठडी आज संपणार होती. 8 सप्टेंबर रोजी रियाला अटक करून तिची रवानगी भायखळा तुरुंगात करण्यात आली होती. पोलीस कोठडीऐवजी रियाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली होती. रियाने ड्रग्ज देवाण-घेवाणीत आपला सहभाग असल्याचे मान्य केल्यावर एनसीबीकडून तिला अटक करण्यात आली होती. रिया चक्रवर्ती या प्रकरणात दोषी आढळल्यास तिला 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते.

अमली पदार्थ विकत घेणे, त्यासंदर्भात अन्य आरोपींशी संगनमत करणे, याबाबत रियाविरोधात भक्कम पुरावे असल्याचे NCB ने म्हटले आहे. या संदर्भात एनसीबीचे पथक रियाची चौकशी करत होते. याआधी रियाचा भाऊ शौविक, सुशांतचा व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा, नोकर दीपेश सावंत, अमली पदार्थ विक्रेता झैद विलात्रा, राहील विश्राम, कैझान इब्राहिमसह नऊ जणांना NCB ने अटक केली होती. त्यापैकी शौविक, सॅम्युअल, दीपेश यांच्यासमोर रियाची चौकशी करण्यात आली. सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचे धागेदोरे अमली पदार्थाशी जोडलेले आहेत का, याबाबतही एनसीबीकडून तपास सुरू आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *