सुशांतच्या शेवटच्या सिनेमातील आणखी एक गाणं रिलीज
मनोरंजन

सुशांतच्या शेवटच्या सिनेमातील आणखी एक गाणं रिलीज

Ramsing Pardeshi

मुंबई - Mumbai

सुशांत सिंह राजपूत याचा शेवटचा सिनेमा दिल बेचारा लवकरच प्रदर्शित होणार आहे. २४ जुलैला सिनेमा डिजिटली रिलीज होणार आहे. याआधी सिनेमातील गाणे रिलीज होत आहेत. ’दिल बेचारा टायटल ट्रॅक’ आणि ’तारे गिन’नंतर आणखी एक गाणं रिलीज झालं आहे. ’खुलके जीने का’ हे गाणं रिलीज झालं असून याच सुशांत आणि संजना सांघी यांची केमिस्ट्री दिसत आहे.

’खुलके जीने का’ गाण्याचं शूटिंग पॅरिसमध्ये झाली होती. हे गाणं अरिजीत सिंह याने गायलं असून लिरिक्स अभिजीत भट्टाचार्या यांनी लिहिले आहेत.

याआधी मुकेश छाबडा यांनी गाण्याच्या लिरिक्स सोबत शूटिंग दरम्यानचे काही फोटो शेअर केले होते. सुशांत, संजना आणि मुकेश यांनी पॅरिसमध्ये शूटींग दरम्यान वेळ एकत्र घालवला होता.

संजनाने देखील गाण्याचं पोस्टर शेअर केलं आहे. दिल बेचारा या सिनेमातून संजना सांघी बॉलिवुडमध्ये डेब्यु करत आहे. कॉस्टिंग डायरेक्टर मुकेश छाबडा हे देखील डायरेक्टर म्हणून डेब्यू करत आहेत.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com