सुशांतसिंह प्रकरणी सीबीआय चौकशीची शिफारस

jalgaon-digital
1 Min Read

पाटणा | Patna –

अभिनेता सुशांतसिंह राजपूत actor Sushant Singh Rajput मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्याची शिफारस करण्यात आली आहे. सुशांतसिंहचे वडील के. के. सिंह यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी चर्चा करून या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी केली. या नंतर राज्याचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांना या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश दिले. Central Bureau of Investigation (CBI)

दरम्यान, बिहार सरकारने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केली आहे. जनता दलाचे (संयुक्त) नेते संजय सिंह यांनी बिहार सरकारने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केल्याची माहिती दिली. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी बिहार पोलिस सक्षम होते, मात्र महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र पोलिसांनी त्यांना काम करू दिले नाही, असेही संजय सिंह म्हणाले. आता सीबीआय चौकशी झाल्यानंतर या प्रकरणात दूध का दूध, पानी का पानी होईल, आणि सत्य पुढे येईल असेही ते म्हणाले.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सुशांतसिंह प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत होण्यासाठी त्यासंबंधीची कारवाई लवकर सुरू करावी असे निर्देश मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्याचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडेय यांना यापूर्वीच दिले आहेत. दरम्यानच्या काळात सुशांतसिंह राजपूत यांचे वडील के. के. सिंह यांनी पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांच्याशी चर्चा केली. या सर्व प्रक्रियेनंतर बिहार सरकारकडून या प्रकरणाचा तपास करण्याची विनंती सीबीआयला करण्यात आली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *